जनावरांची वाहतुक करणारे वाहन पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील भंडारा ते पवनी टोलनाका ते अर्जुनी पुनर्वसन परिसरात सापळा रचुन वरठी पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाºया वाहनावर कारवाई करीत ३५ जनावरांची सुटका केली तसेच चार आरोपींना अटक केली.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानीे यांच्या निर्देशानुसार वरठी पोलीस स्टेशनचे पोनि. निशांत मेश्राम व त्यांच्या पथकाने केली.विशेष म्हणजे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गोवंश तस्करीबाबत दै.भंडारा पत्रिका वृत्तपत्राने अनेकदा बातम्या प्रकाशित केल्या आहेत.व त्याची जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दखल घेतल्याचे आजच्या कारवाईवरून दिसुन येते. दिनांक २१ सप्टेंबर रोजी वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांनी त्यांच्या पथकासह भंडारा ते पवनी टोलनाका ते अर्जुनी पुर्नवसन परिसरात सापळारचुन आरोपी टाटा अल्ट्रा वाहन क्र. एमपी.०४ जीबी ४४५६ ला अडवुन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागाच्या डाल्यामध्ये पांढºया, काळया, व लाल अशा लहान-मोठयास्वरूपाचे २ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे ३५ जनावरे अपुश्या जागेत,अत्यंत निर्दयीपणे बांधुन त्यांची वाहतुक होत असल्याचे दिसुन आले.

पोलीसांनी सर्व जनावरांची सुटका करीत त्यांची गौशाळा येथे रवानगी केली.तसेच आरोपी नामे मनोज कुमार उबारुदास सोनवाणी वय २७ वर्षे रा. खुर्शीपार/ भिलाई , संजय कुमार फुलदास वजारे वय ३२ वर्षे रा. बानबरत अहिवार , चालक जगदीश भीमराव लीगाईत वय ३२ वर्षे रा. ओम नगर मानकापुर/ नागपुर व गुडडुभाई उर्फ मोहमद सकापत उर्फ गुडडु मोहम्मद सफील वय ४४ वर्षे रा. बडी मज्जीद कामठी यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात कारधा पोलीसांत गुन्हानोंद करण्यात आला.पोलीसांनी वाहन व जनावरे असा एकुण मिळुन ७ लाख ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शनात सरकारतर्फे फिर्यादी पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम व पोलीस हवालदार गोमासे,, पोलीस नायक आगासे आरसीपी क्युआरटी यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *