शाळांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची संस्कृती जोपासावी- रंजना कारेमोरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पांढराबोडी : स्नेहसंमेलन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या उपजत सुप्त कला गुणांना वाव मिळत असून स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा कला मंच आहे त्यामुळे प्रत्येक शाळांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची संस्कृती जोपासावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या रंजना कारेमोरे यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. मोहाडी तालुक्यातील इंदु ताई मेमोरियल हायस्कूल तथा कनिष्ठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय हरदोली येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पुढे म्हणाल्या की,अलीकडे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेलेले असून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा. मोबाईलच्या जास्त नादी लागू नये आपले धेय्य गाठण्यासाठी अभ्यास करून उच्च पदवी संपादन करून सनदी अधिकारी व्हावे तसेच एखाद्या कलेचे अभिनय कौशल्य प्राप्त करून सर्वोत्कृष्ट नट, अभिनेता, अभिनेत्री, बनावे, विद्यार्थ्यांनी न घाबरता कलेच्या माध्यमातून स्वत:मधील कला गुणांचे प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण करून रसिक, प्रेक्षक, श्रोत्यांचे वैचारिक प्रबोधन करण्याचा कृती संकल्प करावा असे मत सामाजिक कार्यकर्त्या रंजना कारेमोरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिक्षण महर्षी डॉ.सच्चीदानंद फुलेकर, यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून इंदु ताई शिक्षण संस्थेच्या विश्वस्त विद्या फुलेकर, गटशिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, विस्तार अधिकारी आदमने, जी.प.सदस्य उमेश पाटील, प.स.सदस्य कैलाश झंझाड, माजी सभापती शीला झंझाड, माजी प.स.सदस्या निता झंझाड, सरपंच अल्का झंझाड, माजी सरपंच सदाशिव ढेंगे, पोलीस पाटील पंढरीनाथ झंझाड, विश्वस्त प्रथमेश फुलेकर, विश्वस्त लाभेश फुलेकर, माजी सरपंच रवींद्र झंझाड, सरपंच सुशांत लिल्हारे, उपसरपंच मोहपत झंझाड, अतुल फेंडर, शुभम घोनमोडे, केंद्र प्रमुख वसंत धांडे, बिंदू झंझाड, प्रतीमा डोबने, निशा झंझाड, दीक्षा मते, भाग्यश्री धांडे, डॉ. मते, डॉ.नारायण झंझाड, डॉ. राहुल चव्हाण, जगदीश टेकन, संतोष गायधने, गजानन इलमे, शारदा माटे, संगीता भोयर, मार्कड कंगाले, मुरलीधर झंझाड, अंजिरा झंझाड, विद्या गायधने, जयेंद्र झंझाड, अनिल झंझाड, भिवा गायधने, स्वप्नील माटे, सेवक झंझाड, नरेंद्र भोयर, चंद्रशेखर झंझाड, आनंद भोयर, चेतन देशभ्रतार, बाबू भोयर, मार्कड झंझाड, प्राचार्य ओमप्रकाश चोले तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन खेम चंद हटवार तर आभार प्रा निशा बोरकर यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *