पलाच्या म्मागणीसाठी नागरिक पलावरच ब्बसल उपोषणाला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सालेकसा : रहदारीसाठी घोकादायक ठरलेल्या तालुक्यातील कुवाढास नाल्यावरील पुलाच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी करुनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी श्रमदानातून पुलाची तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र त्यानंतरही पुलाच्या दुरुस्ती वा पुर्नबांधणीसाठी प्रशासनाकडून होणत्याही हालचाली झाल्या नाही. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, २४ आॅगस्ट रोजी नानव्हा व घोणसीच्या ग्रामस्थांनी पुलावरच उपोषणाला सुरुवात केली. तालुक्यातील नानव्हा ते घोणसी दरम्यान असलेले कुंवाढास नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली जातो. सोबतच पूल अत्यंत जीर्ण झाला आहे. त्यामुळे पुलावरुन रहदारी करताना परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पुलाच्या दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी करण्यात याची यासाठी नानव्हा ग्रामपंचायतीने अनेकदा संबंधित विभागाला मागणी केली.

परंतु प्रशासनातर्फे पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनीच श्रमदानातून पुलाची तात्पुरती दुरुस्ती केली. तसेच पुलाची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी करण्याबाबत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा दिला. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. परिणामी आपल्या मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नानव्हा व घोणसी येथील नागरिक आज २४ आॅगस्ट सकाळी ९ वाजता नानव्हाचे सरपंच गौरीशंकर बिसेन, पंचायत समिती सदस्य अर्चना मडावी, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत टेंभुर्णीकर, राजेश कटरे, पृथ्वीराज हरिनखेडे, दुर्गेश चव्हाण, विजयकुमार शरनागत, उमाप्रसाद उपराडे, अविलाश टेंभुर्णीकर, कमलेश कटरे, दिनेश तांडेकर, लालचंद बिसेन, मेरचंद भंडारी, लक्ष्मण बागडे, सेहसलाल जामडीवार, तेजपाल कटरे, टामेश्वर बिसेन, अतुल चव्हाण, धर्मेंद्र भंडारी व दोन्ही गावातील ग्रामवासी उपोषणाला बसले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *