मुर्झा जि.प.शाळेत तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुझे येथे गणित व भाषा विषय शिकवीण्याकरिता पदठीधर शिक्षक देण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन दि. २१ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांच्या नेतृत्वात शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी तत्वरान अंबादे यांना दिले आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. म्हणून शासनाच्या माध्यमातून गावा गावात जिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील गरीब, आदिवासी, वंचित मुलांची संख्या मोठया प्रमाणात असतें. मात्र शाळा असूनही शिक्षक नसल्याने अनेक गावातील शाळा विद्यार्थी विना मोडकळीस आल्याचे दिसून येत आहे. लाखांदूर तालुक्यातील मोजा मुझे येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही काही वर्षांपूर्वी तालुक्यात नावरूपास आलेली होती. त्यावेळी येथे शिक्षक संख्या असल्याने येथील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढलेली होती. येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असून फक्त सध्यस्थितीत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. येथे सन २०१९ पासून तर आज २०२३ पर्यंत कोणत्याही पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. येथे फक्त मागिल काही वर्षांपासून वर्ग १ ते ७ वी पर्यंत दोनच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थीची शैक्षणिक व बौद्धिक क्षमता खालवलेली आहे. या दोन शिक्षकपैकी पुढील जानेवारी महिन्यात एक शिक्षक निवृत होणार असल्याची माहिती आहे.

शिक्षकाविना विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. सदर शाळेला भाषा व गणित विषय शिकवीन्याकरिता एक किंवा दोन पदवीधर शिक्षकाची त्वस्ति नियुक्ती करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कमी आहे. जिल्ह्यात वर्ग १ ते ४ पर्यंतच्या अशा अनेक शाळा आहेत की त्या ठिकाणी फक्त एकच शिक्षक उपलब्ध आहे. बदली प्रक्रियेनंतर काही ठिकाणी बिना शिक्षकांची शाळा झाल्याने पालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप लावण्याच्या घडामोडी देखील घडल्या होत्या १ ते ८ पर्यंत वर्ग असलेल्या शाळा कुठे एक तर कुठे दोन तीन शिक्षक सर्व वर्ग सांभाळत आहेत. आज पर्याप्त शिक्षक असलेली जिल्ह्यात एकही शाळा नाही. प्रत्येक शाळेची स्थिती बिकट आहे. शिक्षणाची ही दुर्गती शासनाने तत्काळ दूर करावी अन्यथा राज्याचं भविष्य अंधकारमय आहे.

एकीकडे लाखो डीएड, बीएड धारक बेरोजगारीच्या भट्टीत जळत असताना शिक्षक भरती न राबवता सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय म्हणजेच बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखे आहे. राज्यात असंख्य योजनांवर खर्च केला जातोय. परंतु देशाचं भविष्य ज्यात दडलेलं आहे अशा शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण घटकाकडे शासनाचे दुर्लक्ष होणे हे दुदैर्वी आहे. ग्रामीण, आदिवासीबहुल आणि गरीब घटकातील बालकांचे शैक्षणिक आयुष्य शिक्षकांच्या अभावामुळे धोक्यात आले असून शिक्षणाच्या खासगीकरणाला पाठबळ मिळत आहे.ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात जिल्हा परिषद शाळा संपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शाळा वाचविण्यासाठी तत्काळ शिक्षक भरती प्रक्रिया राबवून प्रत्येक शाळेला किमान ‘जेवढे वर्ग तेवढे शिक्षक’ शासनाने उपलब्ध करून द्यावे. असाही पावित्र्या ग्रामस्थांनी उभारला आहे यामुळे भविष्यात मराठी शाळेतील होणारी विद्यार्थ्यांची गळती थांबेल असे मनोगत निवेदन सादर करुन बाहेर निघतानीगावकºयांनी बोलून दाखविला यावेळी निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेघराज ब्राह्मणकर, उपाध्यक्ष यामिनी गोंधळे, सरपंच नंदकिशोर महाले, उपसरपंच प्रकाश बोरकर, त.मु.अध्यक्ष प्रॉपेसर किरपान, पो पा विजय हुकरे, विलास बावणे, करुणा मेश्राम, शोभा टेम्भूरणे, प्रकाश आंबादरे, सुधाकर ठलाल, मनीषा ठलाल, नलू वंजारी, निर्मला झोडे, सचिन खोब्रागडे, पालक विश्वानाथ ठूलाल, शेषराव ठलाल, शरद ठलाल, सुभाष हेमने यासह ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *