रोजगार हमी योजना अंतर्गत काम सुरू करा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: मोहाडी नगरपंचायत येथे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे माहीती अधिकारात उघड झाले आहे. सन २०२१२०२२ मधे नगर विकास संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी आमदार राजु माणिकराव कारेमोरे यांचामार्फत वैयशिष्ट पुर्ण योजने अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे सुचविली होति व त्याचा नियमित पाठपुरवठा केल्याने ते कामे मंजूर सुद्धा झाली त्या त्रमधे प्रभाग २ व प्रभाग ३ मधे सर्वात जास्त कामे होती, परंतु निवडणुकीचा आचार सहिंतेमुळे ती कामे थांबविण्यात आली होती. निवडणुक नंतर सदर काहीं कामे करण्यात आली व बाकी कामे अजून ही करण्यात आली नाही.

जसे प्रभाग ३ मधे हंसराज निमाजे ते लता हेडाऊ व प्रभाग २ मधील बरीच कामे कामे करण्यात आली नाही. महिती अधिकार अंतर्गत महिती मागितली असता सर्व कामे झाल्याचे दाखविण्यात आले. ज्या ठिकाणी लोकेशन नाही त्या भलत्याच ठिकाणी कामे करण्यात आली. उर्वरित बाकी लाखो रुपयाचा निधी अफरातफर करण्यात आला. हे मागितलेल्या महिती मधे स्पष्ट दिसत आहे. तसेच घरकूल गरजू व्यक्तींना न मिळता २ वर्षा अगोदर पुर्ण झालेले बांधकाम २०२२ ला झाल्याचे दाखवून चेक देऊन भ्रष्टाचार केला. २०१६ पासून शासनाचे आदेश असताना सुद्धा रोजगार हमीचे कामे सुरू करण्यात आली नाही.

तसेच प्रभाग क्मांक ३ मधील श्री रियाज हनफी व उके मॅडम यांचा घराजवळील बंद असलेली बोरवेल त्वरित सुरू करण्यात यावी. या सर्व प्रकारची तक्रार संपुर्ण कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व खासदार सुनील मेंढे, आयुक्त नागपूर विभाग नागपूर, जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना करण्यात आली असून लवकरच नगर पंचायतकार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे नगर विकास संघर्ष समितीचे खुशाल कोसरे, बबलु सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, सुखदेव पात्रे, नितिन निंबार्ते, काशिनाथ रंभाड, महादेव निनावे व पदाधिकारी यांनी दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *