साकोली येथील शंकरपटात शिवनी येथील ‘सर्जा राजाचा बोलबाला’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली पट समितीतर्फे दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२३ रोजी शंकर पट भरवण्यात आले होते. १९५३ पासून साकोली येथे पट भरत आहे, परंतू या कोरोना कालावधीत आणि कोर्टाच्या निर्णयामुळे पट बंद करण्यात आले होते. आता या दहा वषार्नंतर प्रथमच मोठ्या उत्साहाने युवक मंडळांनी पट समितीमार्फत पट भरवण्यात आला. या बैलांच्या शंकरपटात मध्यप्रदेशातील शिवनी येथील शुक्ला यांची बैलजोडी प्रथम बक्षीसाचे मानकरी ठरले. तर द्वितीय बक्षीस इमरान शिवनी यांना मिळाले. तिसरे बक्षीस शुक्ला शिवनी, चतुर्थ बक्षीस राकेश झिल्पी, डॉ. सचिन रहांगडाले यांना दोघांनाही अर्धे अर्धे बक्षीस सारख्या जोडी आल्यामुळे पंधरा-पंधरा हजाराच्या बक्षीस मिळाले व पाच बक्षीस देण्यात आले. पाचव्या नंबरचा बक्षीस सागर कळपते बोंडे, बाकी इतर ५१ जोळ्यांना बक्षीस देण्यात आले. पाचव्या नंबरच्या बक्षीसला ११ हजार रुपये देण्यात आले. या कामाकरीता सपण कापगते, प्रभाकर सपाटे, सुरेशसिह बघेल, हेमंत भारद्वाज समितीच्या लोकांनी मेहनत घेतली. नवीन पट समितीच्या लोकांनी जुन्या पटसमितीचा कार्यकर्त्याचा सत्कार केला. यावेळी शंकरपटात पट शौकिनांसह शेतकरी व नागरिकांनी तूफान गर्दी केली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *