रवि ठवकर सर्वस्तरीय कलाकार परिषदच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गणेश आतिलकर

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : जिल्ह्यातील सर्व नवकलाकारांना दिशा व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार परिषद अखिल सभागृह गणेशपुर भंडारा येथे नव्याने गठीत करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचे जेष्ठ कलाकार व माजी वय वृध्द निवड कलाकार समितीचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक रामनाथ कळंबे, निरंजन कानतोडे, रामरतन खोकले, नंदलाल बन्सोड, यांचे मार्गदर्शननुसार भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार परिषद करीता अध्यक्ष म्हणून रवि ठवकर, उपाध्यक्ष गणेश आतिलकर, सचिव लक्ष्मण हारगुडे, सह सचिव रेखाताई पटले, कोषाध्यक्ष प्रेमलाल भोयर, सहकोषाध्यक्ष सुखदेव मारबते, संघटक प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख कार्तिकस्वामी मेश्राम, महिला संघटीका सुषमा लिमजे, संघटक हेमलता हारगुडे, भारती साठवणे, पांडुरंग खोब्रागडे, कौतुका सार्वे आदींची नव्याने निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरूवात परिचयाने करण्यात आली. नंतर सर्व उपस्थीत कलाकारांचे मनोगत व चर्चा करण्यात आली. जेष्ठ कलाकार मुख्य मार्गदर्शक म्हणून रामनाथ कळंबे, निरंजन कानतोडे, रामरतन खोकले, नंदलाल बन्सोड, हेच राहतील व यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्याची व तालुक्याची सर्व कलाकर परिषद कार्य करेल असे सवार्नुमते ठर- विण्यात आले. चर्चेत दुर्जन ढेंगे, श्रीकांत तुमसरे, शिवशंकर भोयर,निलेश पोटफोडे, अतुल कानतोडे आदी कलाकार उपस्थीत होते. संचालन कार्तिकस्वामी मेश्राम यांनी केले तर शेवटी नंदलाल बन्सोड यांनी सर्वांचे आभार मानले. सहकार्याकरिता सर्व कलाकारांनी सहभाग केला,

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *