वाघान केली रानडुकरांची शिकार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील शेतकरी विक्रम पटले यांच्या शेतावर वाघाचे फगमार्क आढळून आले असून वाघाने रानडुकरांची शिकार केल्याची घटना सोमवार दि.१३ मार्च ला दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती होताच कांद्री वन विभागा अंतर्गत आंधळगावचे क्षेत्र सहाय्यक डी.बी.वानखेडे, वनरक्षक निखील साखरवाडे,वनमजूर देवानंद पाटील घटनास्थळी दाखल झाले. मोहाडी तालुक्यात वाघांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एक तरी वाघ दिसावा म्हणून हौशी पर्यटक अभयारण्यात जात असतात. मात्र तालुक्यातील नागरिकांना अभयारण्यातील स्वरूप बघायला मिळत आहे. परिसरातील वाघ मुक्तपणे संचार करीत आहे. त्यामुळे पुन्हा परिसरात वाघाची दहशत निर्माणझाली आहे. गेल्या चार दिवसात वाघाने तीन रानडुकरांची शिकार केल्याची घटना परिसरात घडली आहे. पगमार्क (ठसे) वरून वाघ मोठा असल्याचे दिसून येत आहे.
सध्या गहू, लाखोरी, हरभरा कापणीचा हंगाम सुरू असून उन्हाळी धानपीक लागवड केल्याने त्यावर औषधी व खते मारण्याचे कामे शेतात सुरू असून वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतावर जाईल कसा ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सदर परिसरात वाघ-वाघिणीचे जोडपेअसल्याचा चर्चेला आता ऊत आला असून तालुक्यात मागील महिन्याभरापासून वाघाचा मुक्त संचार पहायला मिळत आहे. त्यामध्ये सालई खुर्द, सिहरी, ताडगाव आणि धोपगाव जणू वाघाचे घर ठरले आहे. दिवस असो की रात्र वाघ शेतात अथवा रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे शेतीचे कामं पुर्णपणे ठप्प झाले आहे. मजूर किंवा शेतकरी शेताकडे जायला घाबरत आहेत. दूसरीकडे रात्री कृषी पंपाला वीज मिळत असल्याने शेतात जायला कुणीही धजावत नाही. वनकर्मचारी सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जखमी होताना दिसत आहे. मात्र शेतशिवारात वाघाचा मुक्त संचार रोखण्यास वनविभाग सुध्दा असमर्थ ठरत आहे. वाघाला या परीसरातील शेतशिवारात पटकन शिकार मिळत असल्यामुळे वाघाने या शेतशिवारात आपला ठिय्या मांडला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *