उन्हाळ्यात होणाºया पाणी टंचाईवर मात करण्यास स्त्रोत निर्माण करा – आ. भोंडेकर

भंडारा पवनी पंचायत समितीच्या आमसभेत विविध विषयांवर झाली चर्चा भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधान सभेअंतर्गत असलेल्या भंडारा व पवनी पंचायत समिति तिलकामांचा आढावा घेण्य करिता आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी आम सभा आयोजित करण्यात आली. पवनी येथील पंचायत समिती तसेच भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित या सभेत पंचायत समिती चे सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. या दरम्यान उन्हाळ्यात होणाºया पाणी टंचाई संदर्भात हि विशेष चर्चा करण्यात आली. ज्या नंतर आ. नरेंद्र भोंडेकर यांनी ज्या गावात पाणीटंचाई होते तेथे पाण्याचे स्त्रोत निर्माण करून टंचाई दूर करण्याची सूचना दिली.
कोरोनाकाळातील दोन वर्षे गेल्यानंतर भंडारा व पवनी पंचायत समितिची आढावा बैठक पहिल्यांदा घेण्यात आली. या दोन्ही सभेत आ. नरेंद्र भोंडेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सभेत तालुक्यातील अधिकाºयांनी द्वारेमागील आमसभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली गेली ज्यावर चर्चा करण्यात आली. सोबतच वर्ष २०२१-२२ या वर्षात राबविण्यात आलेल्या योजनेचा आढावा आ. भोंडेकर यांनी घेतला. ज्यात उपस्थित तालुका विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती मांडली.ज्यात विभागाला मिळणारा खर्चित आणि आखर्चित निधी, नगरिकांकरीत चालविली जाणारी योजना, योजना राबविण्यात येणाºया अडीअडचणीवर चर्चा करण्यात आली. माहिती घेतल्या नंतर आ. भोंडेकर यांनी प्रत्येक विभागा मार्फत चालविल्या जाणाºया शासकीय योजना नगरिकांपर्यंत अधिकाधिक पोहोचविणे आणि त्यांना याचा लाभ मिळवूनदेण्याची सूचना दिल्या.
यात कृषि विभागा अंतर्गत चालणाºया योजना ताडपत्री, शेती यंत्रणे, शेत तळे सारख्या अन्य योजना सुद्धा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून शेतकºयांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करावे. सोबतच योजना राबवितांना गावातील लोक प्रतिनिधींना विश्वासात घेवून पात्र शेतकºयांना लाभ देण्याची सूचना आ. भोंडेकर यांनी दिली. आ. नरेंद्र भोंडेकर म्हणाले कि, जी ग्राम पंचायत शासनाच्या संपूर्ण योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देईल त्या ग्राम पंचायतीचा पुढील आमसभेत पुरस्कृत करून त्यांना सम्मानित करण्यात येईल. याच सभेत भंडारा विधान सभा क्षेत्रात उन्हाळ्यात होणाºया पाणी टंचाईची संपूर्ण माहिती आ. भोंडेकर यांनी घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सूचना देतांना ते म्हणाले कि, दोन्ही तालुक्यातील ज्या गावात पाणी टंचाई निर्माण होते त्या गावामध्ये पाणी चे स्त्रोत निर्माण करून गावांना पाणी टंचाई पासून मुक्त करावे. याकरिता महाराष्ट्र शासन च्या माध्यमातून २५० कोटी मंजूर करवून घेण्याचा प्रयत्न सुरु असून ते लवकरच मंजूर होतील असे आश्वासन आ. भोंडेकर यांनी दिले. या आढावा बैठकीला भंडारा व पवनी तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य व सभापती उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *