सकारात्मक निर्णय होईपर्यंत सातबारा आॅनलाइन न करण्याचा निर्णय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी तालुका आधारभूत धान खरेदी केंद्र चालक संस्था संघटनेने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पणन अधिका-यांना निवेदन दिले. आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत शेतक-यांचे सातबारा आॅनलाइन न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात, शासनाने एक टक्क्यावरून अर्धा टक्क्यावर आणलेली धानाची घट तीन टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संस्थांना मिळणारे कमिशन वाढवून २०.४० रुपयावरून ५० रुपये करावे, वारंवार केंद्रांची चौकशी करून संस्थांना नाहक त्रास देणे थांबवावे, संस्थांना मिळणा-या आनुषंगिक खर्चदरवर्षी देऊन त्यात शासनाने वाढ करावी, गोदाम भाडे धानाची उचल होईपर्यंत बांधकाम विभागाच्या भाडे प्रमाणपत्रानुसार देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांसंदर्भात जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत शेतक-यांचे सातबारा आॅनलाइन केले जाणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. पणन अधिका-यांना निवेदन देताना याप्रसंगी पवनी तालुका धान खरेदी संस्था संघटनेचे अध्यक्ष भोजराज वैद्य, उपाध्यक्ष किशोर पंचभाई, सचिव सुधाकर साठवणे, कोषाध्यक्ष नीलेश सावरबांधे, सदस्य देवदास घावडे यासह अनेक संस्था अध्यक्ष तथा सचिव व धान खरेदी केंद्रचालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Afg

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *