पोहण्याच्या सरावासाठी शिवणीबांध जलाशय गजबजला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : प्रत्येक युवा व लहान मुलामुलींना पोहण्यातून व्यायाम आसनाकृत कसरतीत आरोग्य उत्तम राहील व सर्वांना जलतरणाची हौस लागावी, यासाठी तालुक्यातील शिवणीबांध जलाशयात सर्वांसाठी जलतरण प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणात दीडशेच्या वर मुला-मुलींनी व बालकांनी नोंदणी करून सहभाग घेतला. साकोली तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन दृश्य व अथांग महासागर म्हणून शिवणीबांध जलाशयाचे नाव पुढे येते.

येथे दररोज प्रभातकाळी शेकडो जलतरणपटू पोहायला येतात. येथील शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्वीमिंग अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अ‍ॅडव्हेंचर अकॅडमी शिवणीबांधने नावीन्यपूर्ण उपक्रम काढला असून यात सर्वांना जलतरणचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण शिबिर रविवार, २८ मेपर्यंत दोनआठवडे चालणार असून जलतरण प्रशिक्षणाची वेळ दररोज सकाळी ६:३० ते सकाळी ७:३० अशी एक तासाची राहील. यात संघटनेचे उत्कृष्ट जलतरणपटू पोहण्याचे प्रशिक्षण देत आहेत. यात जलतरण प्रशिक्षक डॉ. चंद्रकांत निंबार्ते, अ‍ॅड. मनीष कापगते, राजेश ढोमणे, धनंजय हेडाऊ, परसराम फेंडरकर, जनार्दन दोनोडे, कैलाश लुटे, मारोती भुरे हे सर्व मुला-मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देत आहेत. तर शिवणीबांध जलतरण संघटना साकोली व स्वीमिंग अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अ‍ॅडव्हेंचर अकॅडमी शिवणीबांध सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *