स्टेट बँक परिसरातून अडीच लाख रुपयांनी भरलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविली!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांनी जमा केलेले ग्राहकांचे २ लाख ५० हजार रुपयांची बॅग स्टेट बँकेच्या परिसरात असलेल्या कपाटातून दोन अनोळखी चोरट्यांनी पळविली. येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाºया स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचे संचालक चंद्रशेखर कापगते यांनी ग्राहकाचे जमा केलेल्या पैशांची बॅग चोरट्यांनी बँकेतून गुरुवारी दिनांक २७ आॅक्टोबरला सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी चोरून नेली आहे. चंद्रशेखर कापगते राहणार सेंदूरवाफा हे स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र बँकेच्या परिसरात चालवतात. दिवसभर त्यांनी ग्राहकांचे पैसे देवाण-घेवांचे व्यवहार केले. सायंकाळी चार वाजून ३० मिनिटांनी केंद्र बंद करून दिवसभराची रक्कम २ लाख ५० हजार रुपए बॅगमध्ये भरून बँक परिसरात असलेल्या कपाटाच्या ड्रॉप मध्ये ठेवून ते लघुशंकेसाठी गेले असता त्यांच्यावर पाळत ठेवून असणाºया दोन अनोळखी चोरट्यांनी ती बॅग दोन मिनिटात ड्रॉप मधून काढून चोरून नेली. बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये हे दोन्ही चोरटे कॅमेरा बंद झालेले आहेत. फोटोत दिसणारे वर्णनाचे चोरटे आढळल्यास साकोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *