विद्यार्थी घेत आहेत उन्हाळी शिबिराचा आनंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने जि.प.हायस्कूल साकोली येथे आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थी मैदाना खेळासोबत संगित, नृत्य, गायन, मेहंदि व रांगोळी काढण्याचा आनंद लुटत आहे. उन्हाळी शिबिराची सुरूवात दि. २९ एप्रिल २०२३ ते २० मे २०२३ पर्यंत आयोजित केली आहे. यामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिबिराची सुरवात व्यायाम, योगा घेवून होते. त्यानंतर चित्रकला, इंग्रजी संभाषण, बुद्धीमत्ता चाचणी, संगित, नृत्य, मेहंदि व रांगोळी विविध खेळांमध्ये बास्केटबॉल, व्हालीबॉल, फुटबॉल, बॅटमिंटल, लांबउडी, उंचखडी, थालिफेक, सायकलिंग इ. प्रशिक्षण देण्यात येत आहे. सायकल स्पर्धेत ३० विद्यांर्थ्यांचा समावेश होता.

पालकांनी व विद्यांर्थ्यांनीअसे सहशालेय उपक्रम शाळेने आयोजित केल्याबाबत शाळा समिती अध्यक्ष मदन रामटेके, शाळा व्यवस्थापन समिती हरिश लांजेवार, गटशिक्षणाधिकारी एम.व्ही.कोरे, बी.आर.चौव्हान कु.पी.एस.पडोळे, शाळेचे मुख्याधापक धर्मेंद्र कोचे व संपूर्ण शिबीरास कार्यरत कर्मचाºयांचे आभार मानले. उन्हाळी शिबीर यशस्वी करण्यासाठी सुशांत बांडेबुचे, गिरिश सोनवाने, मुकेश गुरनुले, महेंद्र हाडगे, रंजितसिंह सुतार, एस. आर. राकडे, माहीन शेख, नृत्य रौनक सलाणी, दिग्वीजय चांदेवार, संजय चौधरी, मनिषा खुणे, मसराम, खोब्रागडे, अतकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *