सावधान!… सुर्य ओकतोय आग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अवकाळी वातावरणाचा गारवा संपुष्टात आला असून सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून कमाल तापमान ४3 अंशापर्यंत गेले आहे. तापमानाचा प्रकोप बघता प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील १० दिवस तापमानात आणखी वाढ होऊन ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील १० दिवस उन्हापासून जपून राहण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. या काळातउष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. थोड्याथोड्या अंतराने पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे, घराबाहेर पडताना टोपी, गमछा, दुपट्टा डोके व तोंड झाकण्यासाठी वापरावा, छत्रीचा वापर करावा व सोबत पाणी ठेवावे, अशा लिखित सूचना देण्यात आल्या आहेत. मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शितपेय, शिळे अन्न खाणे टाळवे. उन्हात काम करताना चेहरा व डोके पांढ-या कपड्याने झाकावे. चक्कर येत असल्यास व आजा-री वाटल्यास लवकरात लवकर डॉक्टराकडे जावे. तत्पूर्वी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. घरामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुले बाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

दिवसभर पुरेसे पाणी पीत राहतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकांना केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी व्यक्तीला थंड जागी ठेवावे. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे. पाळीव प्राण्यांनासुद्धा सावलीतठेवून भरपूर पाणी प्यायला द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.
‘‘विदर्भासह संपुर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. पारा ४३ अंश सेल्सियस जवळ पोहोचला आहे. ही लाट सगळ्यांसाठी मोठा अलर्ट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे या काळात निष्काळजीपणा बाळगणे जीवावर बेतणारे ठरू शकते. चेहरा आणि डोके दीर्घकाळ थेट हवा आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्यास सनस्ट्रोक अर्थात उष्माघाताची शक्यता आहे. यामुळे उष्णतेच्या उष्ण वाºयापासून सावध राहावे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेले हे सल्ले लक्षात घ्यावे’’

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.