भंडारा च्या विद्यार्थीनीने अंतराळात शोधले एस्टेरॉयड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सेंट पिटर्स स्कूल बेला भंडारा ची विद्यार्थीनी कु. सनाया संदीप कारेमोरे इयत्ता ३ री हिने इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल सर्च कोलैबोरेशन (आईएएससी ) आणि नासा (नॅशनल औरोनॉटिकस अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन) यांच्या संयुक्त उपक्रम ” एस्टेरॉयड सर्च कैंपैन” मध्ये भाग घेतला, ज्यामध्ये तिने तीन प्रिलीमिनरी एस्टेरॉयड शोधून सर्वांचे मने जिंकली. या कार्याबद्दल नासा ने तिचे कौतुक करून तिला प्रमाणित केले. इंटरनॅशनल आॅस्टोनोमिकल सर्च कोलोबोरेशन हा एक सिटीजन सायन्स कार्यक्रम आहे जो जगभरातील नागरिक शास्त्रज्ञांना उच्च दर्जाचा खगोलशास्त्रीय डेटा प्रदान करतो. ते विद्यार्थ्यांना मूळ खगोलशास्त्रीय शोध लावण्यासाठी आणि खगोलशास्त्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात.

या कार्यक्रमांतर्गत, IASC ने एक अनोखा प्लॅटफॉर्म तैयार केला ज्यात निवडलेल्या सहभागींना पृथ्वीच्या जवळच्या वस्तू शोधण्याची संधी दिली. ज्यामध्ये जगभरातील विविध देशांमधील सहभागींची निवड करण्यात आली होती आणि नंतर त्यांना डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि पृथ्वीच्या जवळ संभाव्य एस्टेरॉयड शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रगत खगोलशास्त्रीय सॉफ्टवेअर, अ‍ॅस्ट्रोमेट्रिका आॅपरेट करण्यासाठी निवडक सहभागींना विशेष प्रशिक्षण दिले गेले. हे सॉफ्टवेअर यूएसए, हवाई येथे असलेल्या ‘पॅन स्टार्स’ (द पॅनोरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम) दुर्बिणीतील प्रतिमांचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते.

लघुग्रह, धूमकेतू आणि निअर-अर्थ आॅब्जेक्ट्स ((NEO) ) शोधण्यासाठी आकाशाचेसर्वेक्षण करण्यासाठी १.८ मीटर (६० इंच) च्या दुर्बिणी वापरली जातात. “मोहिमेच्या शेवटी, कु. सनाया कारेमोरे हिने ठअरअ च्या ठीं१-एं१३ँ डु्नीू३ (ठएड) कार्यक्रमात मोठे योगदान दिले आणि तीन प्रिलीमिनरी एस्टेरॉयड शोधले. प्राथमिक शोध हे मंगळाच्या कक्षेदरम्यान असलेल्या मुख्य पट्ट्यात सापडलेल्या एस्टेरॉयड चे पहिले निरीक्षण आहेत आणि गुरू ग्रहाकडे ज्याला तात्पुरत्या स्थितीकडे जाण्यासाठी आणखी पुष्टी आवश्यक आहे.” यास साधारणपणे पाच वर्षांचा कालावधी लागतो त्यानंतर एस्टेरॉयड सेंटर, इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन (कअव) द्वारे अधिकृतपणे सूचीबद्ध केला जातो. सेंट पिटर्स स्कूल च्या प्रिंसीपल रेजिना मॅडम आणि फादर जयप्रकाश यांनी तसेच शिक्षिकांनी कु. सनाया कारेमोरे हिचे अभिनंदन केले. सनाया ने आपल्या या यशाचे श्रेय तिचे आई वडील व शिक्षिकांना दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *