राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्ह्यात एकता दौडचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज जिल्ह्यात विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरात सकाळी ७ वाजता गांधी चौकात प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासह अनेक विविध विभागप्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात एकतेच्या शपथेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या एकता दौडमध्ये जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, सेवाभावी संस्था यांनी राष्ट्रीय एकतेसाठी यात पुढाकार घेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *