राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचे यशस्वी आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया नेहरू युवा केंद, शिक्षण विभाग, भारत स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवा योजना एन. एम. डी. कॉलेज व जिल्हा विविध क्रीडा संघटनांच्या विद्यमाने ३१ आॅक्टोंबर २०२२ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी “राष्ट्रीय एकता दिवस” कार्यक्रमाअंतर्गत एकता दौड जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. सर्व प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड होते, तर प्रमुख अतिथी म्हणुन श्रृती डोंगरे युवा अधिकारी, चेतना ब्राम्हणकर जिल्हा समन्वयक भारत स्कॉऊड गाईड, विनायक डोंगरवार, रवी रहांगडाले, धनंजय भारसाकळे, कीष्णा बहेकार, किशोर तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘एकता दौड’ मध्ये गोंदिया जिल्हयातील सरासरी २५० धावपटू सहभागी झाले होते. एकता दौडला घनश्याम राठोड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथुन प्रारंभ झाला. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त अध्यक्षीय भाषनातून राठोड यांनी सांगितले की, देशाची सुरक्षा व अखंडता तसेच सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी एकात्मतेची नितांत आवश्यकता आहे. यावेळी चेतना ब्राम्हणकर, श्रृती डोंगरे, विनायक डोंगरवार यांची समर्पक भाषणे झालीत. राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक ए. बी. मरसकोले कीडा अधिकारी यांनी केले तर आभार नाजुक उईके, राज्य कीडा मार्गदर्शक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय चे शिवचारण चौधरी, सुमित सुर्यवंशी, जयश्री भांडारकर तसेच विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. विशाल ठाकूर अंकुश गजभिये, ऋतुराज यादव, केशव मेश्राम यावेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *