धान खरेदीबाबद चुकीचे धोरण व जटील नियम रद्द करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गोडाऊन भाडे, कमिशनचे पैसे मागील पाच वर्षांपासून दिले नसल्याने व अनेक जाचक अटींमुळे अनेक धान खरेदी संस्था आर्थिक डबघाईस आल्या आहेत. अशात पुन्हा राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रक काढून धान खरेदी करणा-या सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था शेतक-यांकडून जेवढा धान खरेदी करतील त्यांच्या चुका-याची अगावू रक्कम धान खरेदी करण्यापूर्वीच राष्ट्रीयकृत बँकेत जमा करून बँक गॅरंटी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या जाचक अटी न्यायसंगत नसल्याने त्या रद्द कराव्या याबाबत शासकीय आधारभूत धान खरेदी करणा-या सहकारी संस्थेच्या संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न, नागरी पुरवठा तथा संरक्षण मंत्री यांना निवेदन पाठविले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.