कोथणा त इदरखा रस्ता तात्काळ मजर करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोथुर्णा ते इंदूरखा रस्ता, लावेश्वर ते लावेश्वर मोड रस्ता तात्काळ मंजूर करावा, रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी उमेश मोहतुरे यांनी भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. कोथुर्णा ते इंदूरखा, लावेश्वर ते लावेश्वर मोड रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असुन पावसाळयात त्या खड्यात पाणी साचुन राहत असल्याने प्रवास करतांना मोठया अडचणीचा सामना करावा लागतो. या मार्गाने मोठया प्रमाणात शाळकरी मुले- मुली, शेतकरी, शेतममजुर, कामगार यांचे अवागमन असल्याने चिखलातुन पाय तुडवीत जावे लागते. सध्या पावसाळा सुरू असुन या खड्यातील पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांचे तोल जावुन अपघातात लहान मोठया दुखापती होत आहेत.

या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी या अगोदर सुद्धा नागरीकांनी अनेकदा निवेदन दिली, आंदोलने सुद्धा केली मात्र त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. सदर रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत येतो. इंदूरखा गावातील नागरिक व शाळकरी मुले-मुली, नवप्रभात हायस्कूल कोथुर्णा, जि.प. शाळा, येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. तर आयुर्वेदिक उपकेंद्र कोथुर्णा, बाजारासाठी इंदूरखा येथील नागरिक येत असतात. तर रोहना इंदूरखा येथील नागरिक, शाळकरी मुले मुली, कामगार, दुग्ध व्यवसाय करणारे , प्रत्येक कामासाठी भंडारा ला येणे जाणे करावे लागते, लावेश्वर वरून खूप मोठे रत्याला खड्डे पडले आहेत, रस्ते चिकलमय आहेत. येजा करतांना खूप बिकट अवस्था रस्त्याची आहे. परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता इंदूरखा ते कोथुर्णा, लावेश्वर ते लावेश्वर मोड पर्यंतचा जिल्हा परिषद अंतर्गत येणारा पूर्ण रस्ता मंजूर करून द्यावा, रस्त्याला निधी देतांना दुजाभाव करण्यात येवु नये अशी मागणी उमेश मोहतुरे यांनी निवेदनातुन केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *