धुटेरा येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया धुटेरा या गावात लावून, जादूटोणा करणी करून दाखवा व २१ लाख रुपयाचे पारितोषिक मिळवा भंडारा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुटेरा या गावात जादूटोणा व करणी केल्याच्या आरोपावरून मारहाण झाली होती. अंधश्रद्धेचे प्रकार वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावक-यंना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की जगात भूत भानामती यांचे अस्तित्व नाही. जादूटोणा करणी भानामती जगात नाही त्यामुळे कोणी कोणाला भूत लावू शकत नाही जादूटोणा करणी करु शकत नाही. जादूटोणा करणी भूत भानामती आहे असे? मांत्रिक,बुवा,बाबा,भक्ताचे म्हणणे असेल तर आम्हाला भूत असे जाहीर आवाहन विष्णुदास लोणारे यांनी केले.ज्या कुटुंबियांवर जादूटोणा केल्याचा आरोप होता त्याची भेट लोणारे यांनी घेतली.या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नितेश बोरकर,गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेदार नितीन मदनकर,पोलीस हवालदार मनोज साकोरे, गणेश बांते व गावातील पोलीस पाटील चित्रकरण पुसाम, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *