रस्त्यांवर खड्डयाचे साम्राज्य, प्रशासन झोपेत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर व शहरालगत असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष घालुन रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा शहर हे जिल्हयाचे मुख्यालय असल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यातुन नागरीक येथे विविध कामाकरीता येत असतात. सोबत छत्तीसगढ व मध्यप्रदेश हे राज्य जिल्हयाच्या सिमेवर असल्यामुळे भंडारा शहराकडे तसेच शहरातून जाणाºया दुचाकी, चारचाकी वाह- नांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र भंडारा शहरातील व शहराकडे येणाºया रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सदर रस्ते वाहन धारकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी ठरत आहे. असे असतांनाही संबंधित सा.बा.वि. तसेच न.प. प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत असुन वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भंडारा शहरात जिल्हाभरातून व बाहेरून सुध्दा विविध कामाकरीता नागरिक येत असतात. परंतु शह रातील राजीव गांधी चौका शेजारील तकियाकडे जाणारा रस्ता, अण्णाभाऊ साठे चौक ते जे.एम. पटेल कॉलेज रस्ता, शासकीय आय.टी. आय. कॉलेज ते दुध शितकरण केंद्र ते दाभा या रस्त्यांची फार चाळण हो- वून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल आहेत.

मात्र जनप्रतिनिधींच्या दबा वाखाली काम करणारे सा.बां. विभाग व न.प. भंडाराच्या अधिकाºयाना सदर बाबी लक्षात येवू नये हे भंडाराकरांसाठी आश्चर्यकारक नाहीच परंतु अशा खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब बनली असुन हया खड्ड्यामुळे अनेक नागरीकांमध्ये मणक्याचे आजार बळावले आहेत. परंतु संबंधीत विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांचे बांधकाम करतांना सदर रस्त्यांची दोन वर्षाकरीता देखभ लीची जवाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची असतांना हे खड्डे बु- जविल्या जात नाही हे विशेष. करीता प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवून आठवडाभरात हे खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा शिवसेना (उ.बा. ठा.) पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदन देतांना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, युवा सेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, शहर प्रमुख आशीक चुटे, युवा सेना शह- रप्रमुख हर्षल टेंभुरकर, सुधीर उरकुडे, राकेश आग्रे, गंगाधर निंब् गर्ते, विनोद डाहारे, गुरूदेव साकुरे, प्रदीप घरत, हरिश्चंद्र वाठ, प्रवीण पवळे, मयुर हलमारे, बालु जगनाडे, राहुल सरोदे, चंदु जगनाडे आदि उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *