रानडुकराच्या हल्ल्यात मजूर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : मोहरी पिकाची कापणी करीत असताना रानडुकराने हल्ला चढविल्याने शेतकरी गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी सोमवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास डोकेसरांडी शेत शिवारात घडली. गोवर्धन ईसन मिसार वय ४५, रा. डोकेसरांडी असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी शेतमजुराचे नाव आहे. डोकेसरांडी येथील विठ्ठल मिसार यांच्या मालकीच्या शेतात रब्बी हंगामात गहू पिकाची लागवड करण्यात आली आहे. लागवडीखालील पीक कापणी करण्यासाठी आल्याने घटनेतील गोवर्धन हे त्यांच्या शेतात मोहरी पिकाची कापणी करण्यासाठी गेला होता. अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात गोवर्धन गंभीररीत्या जखमी झाला. दरम्यान, परिसरातील शेतकºयांनी आरडाओरड करून रानडुकरांना हुसकावून लावले. गोवर्धनला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *