‘जय जय हनुमान’ च्या गजराने निनादली ‘अड्याळ नगरी’

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : पवनी तालुक्यातील हनुमंत नगरी तसेच घोडा यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेले अड्याळ येथे सर्व धर्म सामूहिक बंधू भावाने दि. ०६ एप्रिल २०२३ ला यात्रेचा समारोप करण्यात आला. अवघ्या तरुणाईचे आराध्य दैवत श्रीरामभक्त श्री हनुमतांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील प्रसिद्ध हनुमान देवस्थान पंचकमितीचे मंदिरात सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली होती. जन्मोत्सवासह विधीवत पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अड्याळ येथील घोडायात्रे निमित्त श्री रामनवमी ते श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात गुरुवारी समारोपीय कार्यक्रमात श्री ग्रामविकास एकात्मता भागवत समिती आणि श्री हनुमान देवस्थान कमिटी, आणि ग्रामवासी यांच्या वतीने संगीतमय श्रीमद भागवत कथाह.भ.प.संतोषानंद शास्त्री महाराज वृंदावन यांच्या अमृत तुल्य वाणीतून संपन्न झाला.
आजच्या गोपाल काला, सर्व धर्म सामुहिक विवाह सोहळा, महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, विशेष अतिथी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद सदस्या सौ.सुवर्ण मुंगाटे, पं.स. सदस्या सौ. सीमा गिरी, उपवनसंरक्षक गवई, माजी जि. प. सदस्य युवराज वासनिक, माजी जि. प. सदस्य देवेन्द्र हजारे, सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मानापुरे, तंटा मुक्ती धनंजय मुलकलवार, श्री हनुमान देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष निलकंठ गभने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मुन्ना बोदलकर हे होते. यावेळी सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत समितीचे अध्यक्ष डॉ. उल्हास हरडे यांनी केले.
सर्व अतिथींनी कार्यक्रमाच्या अनुसंगाने त्यानंतर सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे संचालन खंडाईत यांनी तर आभारप्रदर्शन भागवत समितीचे सचिव अमोल उराडे यांनी केले. नंतर महाप्रसादाला सुरवात झाली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व हनुमान देवस्थान पंचकमिटी सदस्य तथा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, माजी अध्यक्ष दिलीप सोनुले, सामाजिक कार्यकर्ते जमलेल्या भावीक भक्तांना मार्गदर्शन केले. महादेव देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य,भागवत समिती तथा सर्वधर्म समभाव ग्रामविकास एकात्मता समितीचे सर्व सदस्य, अड्याळ बौद्ध विहार समितीचे सर्व सदस्य, मुस्लिम कौमी एकता कमिटीचे सर्व सदस्य, आदिवासी विद्यार्थी संघ, सर्व दुर्गा उत्सव मंडळ, सर्व गणेश उत्सव मंडळ, शारदा उत्सव मंडळ, गावातील सर्व महिला मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, अड्याळ पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे सर्व कर्मचारी, अड्याळ ग्रामस्थ बंधू भगिनी, बाल गोपाला पासून तरुणाई यांनी सहकार्य केले. यात्रेच्या सुरवातीपासून तर समारोपापर्यंत अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळे तसेच उप निरीक्षक हरीचंद्र इंगोले तथा संपूर्ण पोलीस कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पडली. या सर्व कार्यक्रमामुळे तसेच ‘जय जय हनुमान’ गजराने संपुर्ण अड्याळनगरी दुमदुमली होती, हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.