धान खरेदी केंद्र सुरू करण्याआधी बोनस जाहीर करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : विदर्भात भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून सर्वदुर परिचित आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात धानपिकाची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या हलक्या प्रजातीच्या धानाचा निसवा सुरू आहे. बरेच शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रात धानाची विक्री करतात. आधारभूत धान खरेदी केंद्रातून धानाची खरीप हंगामाची खरेदी सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने धान उत्पादक शेतकºयांसाठी १ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करावे अशी मागणी पत्रपरिषदेत तुमसर पंचायत समितीचे उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. कधी अवर्षण तर कधी ओला दुष्काळ, यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. पिकावरील रोगराई, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीच्या उत्पन्नात सारखी घट होत आहे. यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान असल्याने शेतकºयांच्या हातात किती उत्पन्न येईल हे सांगणे अवघड आहे. त्यातच करपा, खोडकिडा रोगांचा प्रादुर्भाव धानपिकावर वाढत चालला आहे. जंगला लगतच्या शेतजमिनीतील पिकाची वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याच्या घटनाघडत अहेत. अशा चक्रव्यूहात बळीराजा अडकला आहे. ट्रॅक्टरने मळणीचा वाढलेला खर्च, मजुरीचे वाढलेले दर, रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती, यामुळे धानाची शेती ही तोट्यात चालली आहे. तरीही शेतकरी शेती करत आहे.

तोट्यात चाललेल्या शेतीला व बळीराजाला बळ देण्यासाठी शासनाने धान खरेदी आधी १ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करावे, अशी मागणी तुमसरपंचायत समितीचे उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी पंचायत समीती सभागृहात आयोजित पत्र परिषदेतून केली आहे. धानपिकाचे समर्थन मूल्य उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकºयाकडून सांगीतले जात आहे. त्यामुळे उत्पादन खचार्चा विचार करता धानाला बोनस मिळणे गरजेचे आहे . तरच बळीराजा तारेल. नजीकच्या राज्यात धान खरेदीपूर्वीच बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा धानाला बोनस जाहीर करावा. जेणेकरून शेतकरी खासगी व्यापाºयांना धानाची विक्री करणार नाही. महाराष्ट्रात बोनस उशिरा जाहीर होत असल्याने बहुतांश शेतकरी खासगी व्यापाºयांच्या दारात अडकत आहेत. परिणामी संबधित शेतकºयांना कवडीमोल भावाने धानाची विक्री करावी लागत आहे.धान खरेदी पुर्वी शासनाने बोनस जाहीर केला तर कर्ज बाजारी शेतकरी सावकारांच्या दारात जाणार नाही. व शेतकरी वगार्ला दिलासा मिळेल. पत्रकार परिषदेत तुमसर पंचायत समिती उपसभापती हिरालाल नागपुरे, माजी सरपंच तथा ग्रा प.सदस्य आनंद सिंगनजुडे, ग्रा.प. सदस्य अभय गिरीपूंजे, प्रफुल वराडे, कृष्णराव गोमासे आदी शेतकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *