जिल्ह्यात कचरामुक्त गावांकरीता हजारों हातातून महाश्रमदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्वच्छता जनआंदोलन करण्याकरीता १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०२३ या कालावधीत भंडारा जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२३ स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. रविवारी भंडारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये कचरामुक्त भंडारा जिल्ह्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी यांचे मार्गदर्शनात हजारों हातातून सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेकरीता महाश्रमदान पार पडले. स्वच्छता पंधरवाडाची अंमलबजावणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा. व स्व.) एम.एस. चव्हाण यांचे नेतृत्वात सुरू आहे. रविवारी एकाच दिवसी भंडारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये कचरा मुक्त गावाकरीता महाश्रमदान पार पडलेञ भंडारा पं. स. अंतर्गत बेला येथे श्रमदानाचा शुभारंभ करण्यात आला. पं. स. सभापती रत्नमाला चेटूले, गट विकास अधिकारी मा. डॉ. संघमित्रा कोल्हे, गट शिक्षणाधिकारी राठोड, विस्तार अधिकारी श्री तिडके, श्री कुथे, श्री धांडे, सरंपच शारदा गायधने, उपसरंच अर्चनका कांबळे, नागसेन मेश्राम, स्मृती सुखदेवे, ग्रा. पं. व विविध समित्यांचे पदाधिकारी, महिला बचतगट, नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवेची शपथ घेऊन गाव कचरा मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. गावातून स्वच्छता रॅली काढून शेकडो हातांनी प्रादेशीक पाणी पुरवठा कार्यालय परिसर, मैदान परिसरात स्वच्छत ेकरीता श्रमदान केले. बचतगटाच्या महिलांनी प्लॉस्टीक संकलीत केले.

हातात घेऊन रस्ते व पाणी पुरवठा कार्यालय परिसराची स्वच्छता केली. प्लॉस्टीक तुंबल्याने बंद झालेल्या एका नालीतील सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. मोहाडी पंचायत समिती अंतर्गत सर्व गावांमध्ये गट विकास अधिकारी मा. पल्लवी वाडेकर यांचे नेतृत्वात दहेगाव येथून स्वच्छता श्रमदानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सहायक गट विकास अधिकारी मारोती बुजाडे, सरपंच मनोहर राखडे, सचिव शारदा गिरेपुंजे,उपसरपंच श्री पुडके, समुह समन्वयक शशिकांत घोडीचोर, प्रज्ञा देशमुख, ग्राम पंचायत पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. नागरिकांना स्वच्छता शपथ देऊन मंदिर परिसर, गावातील रस्त्यांची स्वच्छता बचतगट महिला, नागरिक, शाळकरी मुले, कर्मचाºयांनी श्रमदानातून स्वच्छता केली. तुमसर पं.स. अंतर्गत गट विकास अधिकारी मा. एम. एस. चव्हाण यांचे नेतृत्वात स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पंचायत समिती स्तरावर पं.स. सभापी नंदू रहांगडाले, यांचे प्रमुख उपस्थितीत श्रमदान करण्यात आले. अधिकारी, कर्मचाºयांना स्वच्छता शपथ देण्यात आली.

उमरवाडा येथे पं.स.सभापती नंदू रहांगडले, सहायक गट विकास अधिकारी श्री घटारे, विस्तार अधिकारी पंचायत श्री. महंत, सरपंच श्री गणेश बनकर, उपसरपंच श्री चंद्रशेखर तरारे, स्वच्छाग्रही प्रदीप लाडसे, पल्लवी तिडके, हषार्ली ढोके व बचतगट महिला व नागरिकांच्या उपस्थितीत महाश्रमदान पार पडले. ओला व सुका कचरा व वर्गीकरणा बाबत माहिती देऊन गाव कचरा मुक्त व प्लास्टिक मुक्तकरण्यासाठी गणपती मंदिर परिसर, गावात स्वच्छता करण्यात आली. साकोली पं. स. अंतर्गत सर्व गावांमध्ये गट विकास अधिकारी पि.व्ही जाधव यांचे नेतृत्वात श्रमदानाची अंमलबजावणी करण्यात आली.

तालुकास्तरीय श्रमदानाचा शुभारंभ लवारी येथे पं. स. सभापती मा. गणेश आदे, जिल्हा परिसद सदस्या शीतल राऊत, प. स. सदस्य अनिल किरणापुरे, सहा. गट विकास अधिकारी एन. टी. मेळे, विस्तार अधिकारी के. डी. टेंभरे, तालुका कक्षाचे जनार्धन डोरले, निरंजन गणविर, उमेदचे बंसोड, तालुका व्यवस्थापक फरकुंडे, सरपंच नरेश नागरिकर, ग्रामविकास अधिकारी रमेश झोडे, ग्राम पंचायत पदाधिकारी, बचत गट महिला, भजन मंडळ, युवक मंडळ, विद्यार्थी ,गावकºयांच्या उपस्थितीत करण्यात आला. सर्वप्रथम स्वच्छता शपथ घेवून गावातून दिंडीकाढण्यात आली. गावातील सर्व सार्वजनिक परिसर, रस्ता, चौक, समाज मंदिर , धार्मिक स्थळे, गुजरी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. घरांमधून ओला व सुका कचरा घंटागाड़ी द्वारे संकलीत करण्यात आला. यावेळी संकलन, वर्गीकरण, परिसर स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक कचरा कुंडी वापराबाबत गृहभेटी मार्गदर्शन करण्यात आले. पं.स. लाखांदूर अंतर्गत गट विकास अधिकारी श्री खुणे यांच्या नेतृत्वात तालुक्यात श्रमदानाची अंमलबजावणी करण्यात आली. ग्राम पंचायत दिघोरी तालुकास्तरीय श्रमदानाचा शुभारंभ पं.स.सभापती अंजना वरखडो, सरपंच सुनिता साळवे, उपसरपंच विजय खोब्रागडे, त्रिरत्ना उके, चेतन मेश्राम, स्वच्छाग्रही मनोहर हटवार, ग्रा.पं. पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व महिलांची यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी स्वछता शपथ देऊन बाजार परिसर, बसस्टॉप व ग्राम पंचायत परिसरात स्वच्छता श्रमदान करण्यात आले. पवनी पं.स. अंतर्गत गट विकास अधिकारी मा. सिंगनजुडे यांचे नेतृत्वात सर्व गावांमध्ये श्रमदान पार पडले. तालुकास्तरीय शुभांरभ ग्राम. पंचायत काकेपार येथे करण्यात आला. यावेळी सरपंच शारदा मालोदे, तालुक्याचे जगदीश तºहेकर, ग्रा. पं. सदस्य कलावती मालोदे, गजानन मालोदे, स्वच्छाग्रही जगदीश मालोदे व अन्य कर्मचाºयांची उपस्थिती होती. यावेळी शालेय परिसर, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता, गाव परिसराची साफसफाई करण्यात आली. नागरिकांना स्वच्छता शपथ देण्यात आली. लाखनी पंचायत समिती अंतर्गत गडेगाव येथे गट विकास अधिकारी श्री गिºहेपुंजे, सरपंच वर्षा रेहपाडे, सचिव सुधाकर गायधने,प्रशांत मेश्राम, ग्राम पंचायत पदाधिकारी, बचतगटाच्या महिला, नागरिकांच्या उपस्थितीमध्ये गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *