आ. नाना पटोले यांच्याकडून अपंगांना सायकलची मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील किरमटी येथील देवकाबाई देविदास शहारे ह्या गेल्या काही दिवसांपूर्वी त्या महिलेला अर्धांगवायु झाला होता. त्यामुळे चालता फिरता येत नव्हते, अशातच घरची परिस्थिती बिकट असल्याने घरातील सर्व व्यक्ती कामावर जायचे. त्यामुळे घरी देवकाबाई ही एकटीच राहायची. देवकाबाई आपले मन मारून न्यायची, अशातच गावातील काही काँग्रेस कार्यकर्ते यांनी सदर घटनेची माहिती आमदार नाना पटोले यांना दिली. यातच नानाभाऊ यांनी लगेच कोणताही विलंब न करता देवकाबाईला अपंग सायकल देण्याचा निर्णय केला.
अशात नानाभाऊंनी शब्दाचे पालन करून देवकाबाईला नवीन अपंग सायकल उपलब्ध करून दिले. त्या अपंग व्यक्तीची काठी बनवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे परिसरात कौतुक केले जात आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील देशकर, काँग्रेसचे कार्यकर्ते लेकराम ठाकरे, सरपंच घनश्याम हजारे, कैलास सहारे, जगजीवन हजारे, मोनू देशकर, शालिक कोडापे, प्रफुल मस्के, सुनीता मेश्राम, टेकचंद शहारे, मोरेश्वर मस्के व आदी कार्यकर्ते तसेच गावकरी अपंग देवकाबाईला सायकल देतेवेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *