कोरंभी (देवी) येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती कोरंभी (देवी) तर्फे दि. १८ फेब्रुवारी व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती निमित्त महाआरती, भव्य महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जॅकी रावलानी, सरपंचा कुसुम कांबळे, पं.स. सभापती रत्नमाला चेटूले, सूर्यकांत इलमे तसेच ग्रामपंचायत कोरंभी देवीचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे प्रतीक शेंडे, प्रशांत कडव, तुषार कांबळे, तुषार तुमसरे, मदन बाभरे, राजेंद्र उके, आदित्य देवगडे, दिनेश चुंभरे, रुगदेव राखडे, संदेश राऊत, निलेश तुमसरे, शेरा देवगडे, रोहित देवगडे, प्रवेश सार्वे, नंदू देवगडे, पवन मेश्राम, महेश तितिरमारे, अविनाश उके, राहुल सदावर्ती, विक्की सार्वे, गोल्डी शेंडे, अजय लुटे, नाना कांबळे, अंकित पगाडे, जयंत बांडेबूचे, अधिकार चवळे, पिंटू चौधरी, आदित्य राखडे, प्रथमेश राखडे, करण भोयर, सोपान सेलोकर, अमित नेवारे, अर्पित लुटे, सुरज खवास, सागर देवगडे, विशाल कोडापे, अक्षय नेवारे, चेतन नागदेवे, चेतन सेलोकर, क्रिष्णा तिजारे, आदित्य वि. देवगडे, तन्मय मारवडे, मंगेश भोयर, निकेश चुंभरे, अनुप कुकडे, यश नागदेवे, तेजस मारवडे आणि समस्त कोरंभी ग्रामवासी यांनी प्रयत्न घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *