टॅब मिळाल्याने अभ्यास होणार सुकर; टॅब वाटप विद्यार्थ्यांची भावना!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आता टॅब मिळाला… महाज्योतीने दिलेल्या टॅबने अभ्यासाला आता गती येईल.. अश्या भावना विदयार्थ्यानी व्यक्त केल्या. प्रसंग होता जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना महाज्योती तर्फे टॅब वाटपाचा. सामाजिक न्याय सभागृहात रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह सहायक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

जेईई, निट या परिक्षाचे प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ८९३ टॅबचे वाटप करण्यात आले. महाज्योतीने विद्यार्थ्यांना याबाबत एसएमएसव्दारे कळविले होते. स्पर्धेच्या या डिजीटल युगात विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या मदतीने अभ्यासातील संदर्भ व इतर माहिती एका क्लिक वर उपलब्ध व्हावी यासाठी हे टॅब महत्वाचे ठरणार आहे. इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात JEE / NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डाटा सीमकार्ड देण्याची योजना प्रशिक्षणाकरीता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना ८९३ टॅब व डाटा सीम वाटपाकरीता टॅब व डाटा सीम वितरित करण्यात आले. टॅब वाटपापूर्वी विद्यार्थ्यांनी आधारकार्ड/ ओळखपत्र, पालकाचे आधारकार्ड/ ओळखपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, १० वी चे गुणपत्रक, बोनाफाईड प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *