गोरक्षकांवरील होणारे प्राण घातक हल्ले थांबवा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोरक्षा हिंदू दल प्रदेश अध्यक्ष राम नंदनवार यांच्यावर लाखांदूर येथे रोशन सेलोकर या गोतस्कराने केलेल्या प्राण घातक हल्ल्याच्या निषेध करीत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या गोतस्करीच्या मुद्दा उपस्थित करण्यात आला. व गोरक्षकांवर वारंवार हल्ले सुरु आहेत. जिल्हात तस्करांना पोलिसांचे भय नसून उलट सर्रासपणे गोवंश तस्करी सुरु आहे. लोकांमध्ये पोलीस पैसे घेऊन गोतस्करांना सहायक करीत असल्याची चर्चा सुरु आहे. अनेकदा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून गोवंश वाचविले आहे.

मात्र अशात गोतस्कर गोरक्षकांवर प्राणघातक हल्लेकरीत असून नुकतेच लाखांदूर येथे गोरक्षा हिंदू दल प्रदेशाध्यक्ष राम नंदनवार यांच्यावर गोतस्कर रोशन सेलोकर याने प्राण घातक हल्ला केल्याने त्या हल्लेखोर गोतस्करावर कारवाई करून गोरक्षकांवर होणारे असे प्राण घातक हल्ले थांबवावे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्ष्- ाक लोहित मतानी यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी गोरक्षा हिंदू दल प्रदेश अध्यक्ष राम नंदनवार, बजरंग दल जिल्हा संयोजक विकास पडोळे, जिल्हा विस्तारक चिन्मय दत्तात्रय, लाखनी प्रखंड संयोजक निशांत पडोळे, मोहाडी प्रखंड संयोजक आकाश रहांगडाले, संदीप रोडगे, अभिषेक उरकुडे, कुणाल सोनवणे, अश्विन मेश्राम, अमन गौर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.