आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाला यश… धान उत्पादक शेतकºयांना १५ हजार हेक्टरी बोनस जाहीर

भंडारा : आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकºयांवर आलेले संकट त्यांना सांगितल्या गेले होते आणि धान उत्पादक शेतकºयांना बोनस देण्याची मागणी केल्या गेली होती. ही मागणी गुरुवारी पूर्ण होऊन शासना द्वारे धान उत्पादक शेतकºयांना रुपये १५ हजार प्रती हेक्टर बोनस देण्याची घोषणा केल्या गेली. आ. भोंडेकर यांच्या प्रयत्नाने मागणी पूर्ण झाल्याने शेतकºयांच्या चेहºयावर आनंद दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्व संध्येला आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकºयांवर आलेले संकटाविषयी माहिती दिली. सोबतच एक निवेदन देऊन शेतकºयांच्या धान पिकांना बोनस देण्याची मागणी केली आणि विधान सभेच्या अधिवेशन काळातही बोनस चा प्रश्न लावून धरला. यात आ. भोंडेकर यांनी सांगितले होते कि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेणारे शेतकरी आहेत परंतु शेती उपयोगी वस्तूंच्या भाव वाढी तसेच निसर्गाच्या प्रकोप, रोगराई मुळे तथा हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करा लागत आहे. अश्या शेतकºयांना योग्य व माफक दारात शेती करिता लागणाºया वस्तू ही उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना अनेक समस्यांना सामोरी जावे लागत आहे. अश्या परीस्थितीत शेतकºयांना बोनस देणे आवश्यक आहे. या मागणीला गांभीर्याने घेत यावर अधिवेशन काळात चर्चा करण्यात आली आणि गुरुवारी झालेल्या सदन कारवाई दरम्यान शेतकºयांना १५ हजार रुपये प्रती हेक्टर बोनस देण्याचे जाहीर केले गेले. आ. भोंडेकरच्या प्रयत्नाला आलेल्या यशाने शेतकºयांमध्ये आनंद पसरले असून जिल्ह्यातील शेतकºयांनी आ. भोंडेकर यांचे आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *