प्रत्येक तालुक्यात होणार दिव्यांग मूल्यांकन शिबिर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे मूल्यांकन शिबिर जिल्हाभर घेण्यात यावीत. दिव्यांग सहित अन्य बाबींचा खासदार सुनील मेंढे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावर आढावा घेतला. दिव्यांग मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून त्याद्वारे दिव्यांगांना आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी संदीप कदम यासह अन्य यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. दैनंदिन जीवन जगत असताना दिव्यांगाना दिव्यांग साधने उपलब्ध नसल्याने बराच त्रास सहन करावा लागतो, असे सांगून खासदार सुनील मेंढे म्हणाले की, सर्व दिव्यांगांचे सर्वेक्षण होऊन मूल्यांकन होऊन त्यांना आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर वयोश्री योजनेअंतर्गत ही त्यांना लाभ देण्यात येणार आहे. नेरला व डावा कालवा या दोन्ही उपसा सिंचन प्रकल्पाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. दोन्ही योजनांमध्ये भूसंपादनाच्या प्रलंबित विषयांना गतिमान करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

महसूल यंत्रणा विशेष तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी गतीने व वेळेत हे काम करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संदभार्तील बाबींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.त्यामध्ये क्रीडा सुविधांचा खेळाडूंना उपलब्ध करून देताना त्या सुविधांचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे, अशी सूचना श्री. मेंढे यांनी यावी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिली. खासदार महोदयांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला दिव्यांग मूल्यांकन शिबीर होणार आहे. त्यानुसार येत्या २७ सप्टेंबरला लाखांदूर, २८ सप्टेंबर रोजी नगरपरिषद गांधी शाळा भंडारा, २९ सप्टेंबर रोजी नगरपरिषद बांगडकर शाळा तुमसर, ३० सप्टेंबर रोजी नगरपरिषद गांधी विद्यालय लाखनी, ४ आॅक्टोबर रोजी गोविंद विद्यालय पालांदूर, ६ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृह मोहाडी, ७ आॅक्टोबर रोजी नगर परिषद शाळा पवनी, ८ आॅक्टोबर रोजी नगरपरिषद गांधी शाळा भंडारा, येथे दिव्यांग मूल्यांकन शिबिराचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी त्या शिबिरात जाऊन स्वत:चे मूल्यांकन करून घ्यावे व त्या मूल्यांकनानुसार त्यांना त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी दिव्यांग साधने उपलब्ध करून देण्यात येतील असे श्री. मेंढे यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.