लाखनी शहरातील वाहतूक व्यवस्थेची ऐसी-तैसी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरातील तालुका मुख्यालयापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वच रस्त्यांवर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अवैध वाहतूक करणाºयांकडून पोलीस प्रशासनाचे आर्थिक हित सबंध जोपासले जात असल्यामुळे नियमबाह्य खाजगी वाहतूक करणाºयांना जणू संरक्षण पुरविले जात आहे. त्यामुळे पोलिस दिखाव्यापुरती केवळ वसुली साठी वाहन थांबवितात वसुली साठी नाममात्र कारवाही करण्याचा धाक देतात इच्छित वसुली झाली की, सोडून देतात त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. शहरातून नागपूर कडे आणि साकोली कडे गोवंश, रेती, मुरूम तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून जनावरांची गाडी येणार याची पूर्व कल्पना या वाहतूक शिपायाला असते त्यामुळे वाहतूक शिपाई आपले खिशे गरम करण्यासाठी केसलवाडा फाटा परिसरात जावून आपले खिशे गरम करण्याच्या नादात जणू मानेगाव पासून त्या जनावरांची वाहतूक करणाºया वाहनाला जणू संरक्षण पुर-विण्याचे काम करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सर्विस रोडवरुन मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी तसेच इतर वाहतूक करणारे वाहनाची वर्दळ असल्यामुळे सर्व वाहतूक मुख्य रस्त्यानेच सुरू आहे. त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत असतात त्यामुळे कुणाला अपंगत्व तर कुणाला आपले प्राण गमवावे लागले असून नागरिकांचाजीव मुठीत आणि पोलीस शिपाई वसुलीत अशी परिस्थिती दिसून येत आहे त्यामुळे याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी हे जिल्ह्याला अपघात मुक्त व अवैध धंदे मुक्त करण्याचा प्रयत्न करीत असले तरीही त्यांनी लाखनी शहरातील या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देवून वाहतूक पोलीस प्रकाश न्यायमुर्ते यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी लाखनी वासियांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *