ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे दुरुस्तीचे काम यशवंत थोटे

मोहाडी : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या वादळाने नागरिक चांगलेच हादरले असून या वादळाची तीव्रता खूप असल्यामुळे घराचे कौल तसेच पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यांचे पहावयास मिळाले.यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. सकाळपासून सुरु झालेला पाऊस समवेत वादळ ही घोंगावत असून यांच्या विळख्यात अनेक घरांना सामावून घेतले. त्याच समवेत अनेक ठिकांचे विजेचे पोल पडल्यामुळे मोहाडी शहरात बत्ती गुल झाल्यांचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. घर बांधताना प्रत्येकांनी पैश्याची थोडी बचत करुन घर बांधले मात्र वादळाने सर्व काही हिरावून घेतले आहे. अश्या स्थितीत मोडलेले घर कसे बांधायचे कोठून पैसे जमा करायाचे या विचारांने घरांचे नुकसान झालेल्या व्यक्तीला ग्रासले आहे. मात्र पंचनामे करुन सुद्धा हवी तेवढी रक्कम मिळतच नाही. या अश्या मोठ्या संकटात प्रत्येक नागरिक ग्रासले आहे. जून महिन्यातील पहिला पाऊस हा नागरिकांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र दरवर्षी पहावयास मिळत असते. मात्र असे असले तरी सुद्धा निसर्गाच्या या चक्रला कोणीही थांबवू शकत नसल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या हतबल होत आहे.

वादळामुळे मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाल्यांचे समोर आली असून घराचे पत्र्ये उडून वाºयामुळे दुसºया घरावर पडल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत हा पहिला पाऊस, आणी वादळ अनेकांच्या मुळावर उठले असल्यांचे समोर आले. त्याच बरोबर मोहाडी तालुक्यातील अनेक गाव अंधारमय झाले असून, अनेक ठिकाणी विजेचे पोल पडल्यामुळे तसेच त्यांच्या केबलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय ज्या मार्गातून हे विजेचे पोल जात असतात त्या ठिकाणी वृक्षच्या फांद्या त्याच बरोबर पावसाळी जमिन ओलसर झाल्यामुळे विजेचे पोल पडल्यांचे निदर्शनास आले आहे. शिवाय घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यक्त केली जात आहे. पावसाचे आगमन होण्याच्या आधी खेडेगावात वेध लागायचे ते आपले घरावरती असलेले छपर व्यवस्थित करण्याचे यासाठी प्रत्येकाचीधडपड सुरु असायची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती कौल सारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची परंतू बदलत्या काळात कौलारू घरे नामशेष होण्याच्यामार्गावरअसल्याने. प्रत्येक व्यक्ती घर बांधताना कौल न वापरता सिमेंटच्या पत्राचा उपयोग करीत आहे.

यामुळे मातीची कौल इतिहास जमा होत चालली आहे. आजही शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना आज आपणस पहावयास मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडूगी करणे गरजेचे असे यालाच घर फेरणे असे म्हणतात. आज घर फेरणारे कारागीरही दुर्मिळ झाले आहे. कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत नाही. यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असायची मातीची कौल ही उन्हाचा जाळ स्वत: शोषूण ते आपल्या शरीरापर्यंत नैसर्गिक गारवा पोहचवत असते. अर्धा लाखांची ए.सी.किंवा कुलरची हवा नैसर्गिक नसल्याने एका मयार्देनंतर त्यांचे दुष्परिणाम शरीरावरनिश्चितच होताना आपणास पहावयास मिळत आहे. पण कौलारू घरे उन्हाळ्यात माणसाचे आरोग्य नीट सांभाळून ठेऊन उन्हाळा सुहह्य करत असते.

आजही खेड्यात चार दोन घरे कौलारू दिसतात मात्र नवीन घर निर्मितीच कौलारू घरे बंद होत असल्याने हळू हळू अस्तित्वात असणारी कौलारू घरेही नामषेश होत चालली आहे हे मात्र निश्चित. जुन महिन्याच्या आगमनामध्ये पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयांच्या आश्या पल्लवीत झाल्या आहेत. काही ठिकाणी तुरळक तर काही धोधो पाऊस येण्याचे संकेत दिल्यामुळे शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची जवळ -जवळ सर्वच कामे पुर्ण झाली असल्यामुळे शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत आहे. पाऊसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत असून पावसाची साथ अशीच द्यावी असे साकडे शेतकरी वर्ग वरुणराजाकडे घालत आहे. शेतीची कामे म्हटली की मजूर लागतात. दरवर्षी पावसाळ्यापुर्वी शेतकरी वर्गांची मोठी लगबग सुरुच असते. मात्र यावर्षी चित्र थोडे वेगळे झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *