संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यपाल कोशारी यांचा तिव्र निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे नेहमीच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महा पुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करीत असतात, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा भंडाराच्या वतीने देशाचे राष्ट्रपती यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी हे त्यांचे वादग्रस्त विधानांसाठी आता प्रसिद्ध झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विपरीत विधाने करून , ते नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात . त्यांचे विरुद्ध वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा राष्ट्रपतींनी त्यांचेवर कोणतीही कार्यवाही केली नाही , त्यामुळेच त्यांची हिम्मत वाढत चालली आहे . नेहमी ते महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महा पुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करीत असतात . शनिवारी १९ नोव्हेंबर ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पदवीदान समारंभात कोशारींनी पुन्हा गरळ ओकली . हे ते अनावधानाने करतात की; जाणून बुजून करतात हा शोधाचा विषय आह परंतु त्यांचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे करीता भगतसिंग कोशारी राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे .

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या खाजपालानी आणि भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी चुकीचे विधान केले व मराठी माणसाच्या भावना दुखावल्या अश्या नालायक लोकप्रतिनिधी विरोधात प्रतिकात्मक निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेड भंडारा जिल्हाच्या वतीने करण्यात आले. तसेच जोरदार जल्लोषात तुमचा आमचा नातं काय, जय जिजाऊ ,जय शिवराय शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ नारे लावण्यात आले. तसेच राज्यपालांच्या विरोधात व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या चुकीच्या वक्तव्यावर यांच्या निषेधार्थ महाराजांच्या विरोधात चुकीचे विधान करणाºयांचा करायचा काय, खालती डोके वरती पाय असे नारे लावण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी प्रशासनाला दोष देत सांगितले, संवैधानिक पदावर असलेले प्रतिनिधी महाराष्ट्राला तोडण्याचा दृष्टिकोनातून राजकारणा करिता असंवैधानिक विधान करू शकतात पण शिवप्रेमी शिवभक्त अश्या मूर्ख लोकप्रतिनिधी विरोधात आंदोलन करून निषेध सुद्धा व्यक्त करू शकत नाही, देशात लोकशाही नाही तर दडपशाही लागू झाल्या असल्याचे, पोलिस अटके च्या वेळेस त्यांनी ह्या भावना पत्रकारां समोर व्यक्त केल्या. यावेळी शिशुपाल भुरे, शशिकांत देशपांडे, श्याम कोसरे ,संकेत मोरे, कृष्णा गोटेफोडे,गिरीश कुंभरे, राज कुलसुंगे,सौरभ कोडापे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *