आदिवासी तरुणावर लघवी करणा-या प्रवेश शुक्लावर कठोर कारवाई करा-बसपा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील प्रवेश शुक्ला, जो तेथील भाजप आमदाराचा प्रतिनिधी आहे. प्रवेश शुक्ला याने पाले कोळ नावाच्या आदिवासी तरुणावर मद्यधुंद अवस्थेत लघवी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बहुजन समाज पक्ष जिल्हा भंडारा यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत निवेदन दिले. हा अतिशय लाजिरवाणा आणि आदिवासी आणि दलितांप्रती द्वेषाचा लज्जास्पद चेहरा समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील भाजप नेत्याच्या अमानुष कृत्याचा बहुजन समाज पक्ष तीव्र निषेध करतो. अशा प्रकारचे कृत्य म्हणजे क्रूरतेची पराकाष्ठा आहे, आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा कृत्याला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. आरोपींवर एसी एसटी कायद्यान्वये कठोर कारवाई करून लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा करत आहे. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, प्रदेश सचिव शंकर भेंडारकर, जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, जिल्हा कोषाध्यक्ष रवि गजभिये, माजी जिल्हा प्रभारी अनिल कुरील, शुक्राचार्य डोंगरे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *