अंगणवाडी कर्मचाºयांनी काढली मोबाईलची शव यात्रा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन भंडारा च्यावतिने १८ जानेवारी २०२३ रोजी मिस्कीन टँन्क गार्डन मुस्लिम लाँयबरी भंडारा जवळून सावित्री फुले यांचे मुखावटे घालून मोबाईल शव याञा जिल्हा अध्यक्ष सविता लुटे कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके, उपाध्यक्ष मंगला गजभिये, गौतमी मंडपे, कुंदा भदाडे, छाया क्षीरसागर, दिपा पडोळे, छाया गजभिये यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून शहरी १०४ व ग्रामीण १९९ बाल विकास प्रकल्प कार्यालयात खराब झालेले मोबाईल जमा करण्यात आले. सदर मोबाईल प्रकल्प अधिकारी यांनी स्विकारले. सावित्री फुले, माँ जिजाऊ यांचा विजय असो शासकीय बोंबल्या परत घ्या, चांगल्या प्रतिचा टँब/ मोबाईल मिळालाच पाहिजे, शिक्षण आम्हचा हक्कच-नाही कुणाच्या बापाचं इत्यादी घोषणा देण्यात आल्या. शासनाने २०१९ ला दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. अशा अनेक तक्रारी यापूर्वी शासन व प्रशासनाकडे केले परंतु अजून पर्यत नविन मोबाईल दिले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका अडचणीत सापडले आहेत. आतातर मोबाईल चालत नाही, अँप डाऊनलोड होत नाही, झालेतर भरलेली माहीती अपलोड होत नाही, चांगल्या प्रतिचा मोबाईल द्या, पोषण टँकर मराठी द्या या मागणीसाठी राज्यभर ३ जानेवारी पासून आयटक च्यावतिने आंदोलन सुरु आहेत. आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संघटना प्रतिनिधीची सोबत बैठक घेवून नविन मोबाईल देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानुसार शासनास प्रस्ताव दिला. बजेट अधिवेशनात महा- विकास आघाडी सरकारने नविन मोबाईल साठी दहा हजार रुपये देण्यात येईल असे बजेट मध्ये तत्कालीन वित्त मंत्री अजीतदादा पवार यांनी मंजूर केले.

सरकार बदलली परंतु अंगणवाडी से- विकांना मोबाईल अजून पर्यत देण्यात आले नाही. शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा अ‍ॅप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे. शासनाने दिलेले मोबाईल त्या पैकी ९०% मोबाईल खराब आहे. नविन एँप डाऊनलोड होत नाही त्यामुळे सर्व सेविका मोबाईल शासनास परत करीत आहेत. याप्रसंगी मोर्च्यात लहानाबाई राजूरकर, शोभा ताईतकर, विजया काळे, मंगला गभने, जयनंदा कांबळे, मनिषा गणविर, धनश्री बांगळकर, उषा मानकर, शिप्रा डाहारे, रंजना खंगार, सुनिता शेंडे, कल्पना हिंगूरकर, आशा झंझाड, उषा गाढवे, मंगला चोपकर, प्रतिभा बावनकुडे, मंगला मिरासे, दुर्गा लोहबरे, छाया गजभिये, फिरोज पठाण, किरण मस्के, आस्मीता रामटेके, शर्मिला भोयर, पिया चेटूले, निता चोपकर इत्यादी शेकडो महिला सहभागी होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *