शेकडो फुटपाथ व्यवसायीकांचा मुख्याधिकाºयांना घेराव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा नगर परिषदेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे विस्थापीत झालेल्या शेकडो फुटपाथ व्यवसायीकांनी आज भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकाºयांना घेराव घालत निवेदन सादर केले.शहराच्या सर्वांगीण विकासाला आमचा विरोध नाही भंडारा शहरातील फुटपाथ व्यवसायीकांचा रोजगार हिराविण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली. तसेच सन २००९ च्या सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून पथविक्रेत्यांची पयार्यी व्यवस्था करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागील १५ दिवसापासुन भंडारा नगर परिषदेतर्पेष्ठ संपुर्ण भंडारा शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.मोहिमेच्या पहिल्याच दिवसापासुन शहरातील फुटपाथ व्यवसायीकांनी स्वेच्छेन स्वत:चे अतिक्रमण काढत नगर परिषदेला सहकार्य केले.

मात्र आता त्याच फुटपाथ व्यवसायीकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.नगर परिषदेने शहरातील फुटपाथवरील रस्त्यालगत अतिक्रमण काढत त्या ठिकाणी सिमेंट पोल लावले असुन लोखंडी जाळी लावण्याचे काम सुरू आहे.सदर ठिकाणी नगर परिषदेतर्पेष्ठ वाहनांची पार्कीग व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ्ननगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील हजारो फुटपाथ व्यवसायीक मोडकळीस आले असुन त्यांचा उदरनिवार्हाचा प्रश्न उभा ठाकला आहे.अशातच बँके,पतसंस्थेचे कर्ज,घेतलेली उसणवार,कुटूंबाचा खर्च,मुलांचे शिक्षण व इतरही आवश्यक गरजा भागवायच्या कशा या विवंचणे आज हे फुटपाथ व्यवसायीक असुन त्याच्यासमोर जीवण मरणाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.अखेर आज जवळपास पाचशे ते सहाशे फुटपाथ व्यवसायीकांनी भंडारा फुटपाथ विक्रेता असोसिएशनचे संरक्षक जॅकी रावलानी, अध्यक्ष अख्तर बेग मिर्झा,सचीव जयराम ठोसरे यांच्या नेतृत्वात भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना घेराव घालीत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये फुटपाथ दुकानदारांची पयार्यी व्यवस्थेकरीता केंद्र शासनाने व सर्वोच्च न्यायालयाने सन २००९ मध्ये शासन नियम काढले आहे. तसेच दिनांक २९.१०.२०१३ महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक रा.फे. धो. २१३२/प्र.क्र.३९ /न.बी.३४ काढलेला आहे.

सदर शासन आदेशानुसार व राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार तसेच ०२ फेब्रुवारी २०१९ नुसार पथविक्रेता सर्वेक्षण संगणक प्रणाली मोबाईल अ‍ॅप द्वारे अंतिम झालेल्या सर्वेक्षण यादीतील पथविक्रेत्याकडून प्रति दिवस १०/- रु. रोज कर वसुली सुध्दा करीत आहेत. परंतु फुटपाथ दुकानदारांना स्वयंम रोजगार करण्याची संधी मिळवून दिलेली नाही. तसेच सर्वेक्षण यादीतील पथ विक्रेत्यांना ओळखपत्र ही आजपर्यंत मिळालेली नाही.करीता भंडारा शहरात शासकिय जागा उपलब्ध आहे. त्या जागेवर १० बाय १० फुटाचे दुकाने (गाळे) बांधून देत फुटपाथ व्यवायीकांचा अतिक्रमणाचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्यात यावा .शहरातील अतिक्रमीत जागेवर बी.ओ.टी.तत्वावर गाळे तयार करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावर मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *