वीरगती प्राप्त झालेल्या कोविड वीज योध्यांच्या स्मरणार्थ चंद्रपूर वीज केंद्रात “निर्भय शिल्प”

भंडारा पत्रिका चंद्रपूर : कोरोना जागतिक महामारीच्या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कार्यरत महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचारी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी तसेच कंत्राटी कामगारांनी अविरतपणे काम करुन वीजेचे अखंडीत उत्पादन ठेऊन राष्ट्राची सेवा केलेली आहे. कोविड काळात जीविताची पर्वा न करता वीज उत्पादनाच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देत असताना सन २०१९ ते २०२१ या कालावधीत कोविड संसगार्मुळे मृत्युमुखी पडलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ३२ कोविड वीज योद्ध्यांच्या स्मरणार्थ विद्युत केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ “निर्भय शिल्प” साकारण्यात आले आहे. हे शिल्प वीज क्षेत्रातील मनुष्यबळामध्ये निरंतर राष्ट्र भावना जागृत ठेवण्याचे, समर्पित कार्य संस्कृतीचे आणि निर्भयतेचे प्रतिक असल्याचे महानिर्मितीचे संचालक (संचलन-प्रकल्प) श्री.संजय मारुडकर यांनी प्रतिपादन केले. निर्भय शिल्पाला पुष्पचक्र अर्पण करून वीरगती प्राप्त झालेल्या ३२ वीज योद्ध्यांना याप्रसंगी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत व्यक्तीच्या परिवाराला म्हणजेच एकूण ३२ कुटुंबांना प्रत्येकी ३० लाख रुपये (कोविडमुळे मृत्यूपोटी) आणि २३ कुटुंबाला प्रत्येकी २० लाख रुपये (गट विमा मुदत योजनेपोटी) असे एकूण १४.२ कोटी अदा करण्यात आले आहे.

श्री.पंकज सपाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभिनव असे निर्भय शिल्प महानिर्मितीमध्ये बहुदा पहिले असे शिल्प असून वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत विपरीत परिस्थितीत अहोरात्र मेहनत घेणाºया मनुष्यबळाचे वैयक्तिक महत्व पटवून देणारे आहे हे विशेष. याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक (कोळसा) श्री. राजेश पाटील, कार्यकारी संचालक(सं व सु-२) श्री.पंकज सपाटे, मुख्य अभियंता श्री.विवेक रोकडे, वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधिकारी, विभाग प्रमुख तसेच दिवंगत कोविड वीज योद्ध्यांच्या परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या भावपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन कल्याण अधिकारी श्री. आनंद वाघमारे यांनी तर उपस्थितांचे आभार श्री.अभय मस्के यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *