लाकडाने भरलेला ट्रक पुलावर लटकला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सावली/चंद्रपुर : ओडिसा येथून बल्लारपूरकडे निलगिरीचे लाकडे घेऊन येणाºया ट्रकसमोर अचानक बैल आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यामध्ये ट्रक थेट पुलावर आदळून लटकला. या घटनेमध्ये सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील तालुक्यातील व्याहाड (खुर्द) गावाजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. ट्रक (एमएच ३४ बीपी ५५५६) ओडिशा येथून बल्लारपूरकडे निलगिरीचेलाकडे घेऊन निघाला होता. दरम्यान, व्याहाड (खूर्द) गावाजवळील शेंडे यांच्या तांदूळ गिरणी समोर ट्रकच्या समोर अचानक बैल आला. यावेळी बैलाला वाचविण्यासाठी ट्रकचालकाने ब्रेक मारले, मात्र नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुलाला धडक दिली.

यामध्ये ट्रकचा कॅबिनपर्यंतचा भाग पुलाच्या खाली जावून लटकला. यावेळी ट्रक थोडा जरी पुढे गेला असता तर पलटी होऊन विजेच्या खांबाला धडकला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर दुसरा ट्रक बोलावून त्यामध्ये लाकडे भरण्यात आली. तसेच याच महामार्गावरील मोखाळा जिल्हा परिषद शाळेजवळ रविवारी रात्री १२ वाजताच्य सुमारास चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन म्हशी ठार झाल्याची घटना घडली. मात्र, त्या म्हशी कुणाच्या आहेत हे अद्याप कळलेले नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *