बँकेची एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बँकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी फरार आरोपीला पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. राजेश वसंतराव राईंचवार (५५) रा. सावली असे आरोपीचे नाव आहे. श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या बँक व्यवस्थापकांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार, जमानतदार राजेश वसंत राईंचवार, मूल्यांकनकर्ता सचिन चिंतावार यांनी संगनमत करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन बँकेची एक कोटीने फसवणूक केल्याची तक्रारसावली पोलिसात केली होती.

या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. न्यायालयांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार व मूल्याकनकर्ता यांना जामीन मंजूर केला होता. परंतु, अडीच वर्षांपासून मुख्य आरोपी राजेश राईंचवार फरार होते. दरम्यान, २४ मे रोजी राजेश राईंचवार हे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असल्याची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अशी केली फसवणूक

१० मार्च २०१६ रोजी राजेश राईंचवार याने पत्नीच्या नावाने श्री कन्यका नागरी बँकेत व्यवसायासाठी ७५ लाख रुपये कजार्साठी अर्ज केला होता. १७ मार्च रोजी त्यांनी अर्जासह सातबारा, मूल्यांकन अहवाल, कर्जदार व जमानतदार यांच्या सह्यांचे नमुना कार्ड इतर आवश्यक दस्तावेज दिले. ७ डिसेंबर २०१६ रोजी पुन्हा बँकेत कर्जमयार्दा ५० लाखाने वाढवून देण्याची मागणी केली. तेव्हा बँकेने २५ लाख रुपये वाढीव कर्ज मंजूर करुन एकूण एक कोटींचे कर्ज दिले.

काही दिवस त्यांनी कजार्चा भरणा नियमित केला. त्यानंतर ते कर्ज थकीत होते. बँकेने त्यांना नोटीस दिली होती. तरीही त्यांनी दुर्लक्ष केले. बँकेने कर्जाचा भरणा न केल्याने जिल्हाधिकाºयांमार्फत जप्तीची कार्यवाही केली. यावेळी तारण संपत्तीचा पंचनामा केला असता, तारण संपत्ती प्रत्यक्षात दिसून आली नाही. याबाबत कर्जदार व मूल्यांकक यांना विचारणा केली असता, उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गुन्हा दाखल केला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.