जिल्हाधिकाºयांनी घेतला नगर पालिका प्रशासन विभागाचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरी भागात नगर परिषद व नगर पंचायतीच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजना व कामकाजाचा आढावा आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत युडी आयडी कार्डची माहिती तयार ठेवावी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या बैठका वॉर्डनुसार घेण्यात याव्यात. रेतीसाठा उपलब्ध असल्याने पावसाळ्यापूर्वी जास्तीतजास्त काम पूर्ण होईल. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सर्व शासकीय कार्यालयाचे फायर आॅडीट करा, त्यासोबतच मॉक ड्रिल व प्रशिक्षणाचे आयोजन सुध्दा करण्यात यावे. पीएम स्वनिधी अंतर्गत डिजिटल व्यवहाराला चालना देण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणासंबंधी मोहीम राबविण्यात यावी.बॅनरवर क्यूआर कोड बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने प्रिंटर्सची संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले. ागर परिषद व नगर पंचायत माध्यमातून राबविण्यात येणाºया नगरोत्थान महाभियान योजना, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, वैशिष्टपूर्ण योजना, घन कचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर वसुली, अमृत योजना इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेतला.

बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे!

शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकºयांना बि-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे. खरीप पीक कर्ज वाटपाबाबत बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. बँक अधिकाºयांची खरीप पीक कर्ज वाटपाबबात आढावा बैठक जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तईकर यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते. शेतकºयांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी आरबीआयच्या निदेर्शानुसार पीक कर्ज वाटप केले पाहिजे. जिल्हास्तरीय बँक अधिकाºयांनी आपल्या अधिनस्त असणाºया इतर शाखेतून पीक कर्ज कमी वाटप होत असल्यास त्यावर बारकाईने लक्ष द्यावे. तसेच कर्ज वाटपाचा नियमित आढावा घ्यावा. विहित कालमर्यादेत पीक कर्ज प्राधान्याने वाटप करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *