तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रातही शेतकºयांना मोफत विज व पाणी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ‘अबकी बार-किसान सरकार’ चा नारा बुलंद करण्याकरीता बीआरएस चे नेते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी.राव यांनी आता महाराष्ट्रावर लक्ष समन्वयक ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी केले.ते आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात सर्वाधीक शेतकरी आत्महत्येकरीता ओळखल्या जाणाºया वेंष्ठद्रीत केले असुन महाराष्ट्रात बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. २० मे पासुन महाराष्ट्रात सुरू झालेल्या बीआरएस पक्षाच्या सदस्य नोंदणीतुन ते सिध्द झाले आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रात लाखों च्या संख्येने सदस्य नोंदणी झाली आहे.येत्या काळात महाराष्ट्र राज्यात बीआरएस पक्षाचे सरकार नक्कीच येणार.

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचे सरकार आल्यास दोन वषार्नंतर तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रातीलही शेतकºयांना मोफत वीज व पाणी उपलब्ध करून देवु असे प्रतिपादन बीआरएस पक्षाचे विदर्भ तेलंगणा राज्यात बीआरएस पक्षाचे नेते मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मागील ९ वर्षाच्या कार्यकाळात अबकी बारकिसान सरकार चा नारा देत शेतकरी हिताच्या अनेक योजना नुसत्या राबविल्या नाही तर त्या यशस्वी सुध्दा करून दाखविल्या. त्यामध्ये तेलंगाणातील शेतकºयांना चोवीस तास मोफत वीज व पाण्याची सुविधा,प्रत्येक हंगामात शेतकºयांना प्रति ऐकरी विना परतावा १० हजार रुपए सहकार्य,शेतकºयांना शेती उपयोगी ट्रॅक्टर खरेदी करण्याकरीता ७५ टक्के अनुदान,मोफत शेतकरी विमा योजना.

शेतकºयाचा कुठल्याही कारणानेमृत्यू झाल्यास सात दिवसाच्या आत त्याच्या कुटूंबियांच्या खात्यात ५ लाख रुपए जमा केल्या जाते यासह अनेक योजना तेलंगाणातील के.सी.आर सरकार यशस्वीरित्या राबवित आहे.एवढेच नाही तर शेतीला २४ तास सिंचना करीता जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प उभा केला.त्या माध्यमातुन २ हजार किमी पर्यंत शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. या सर्व योजना केसीआर सरकार यशस्वीरित्या राबवित असुन या सर्व योजनांचा महाराष्ट्रातील जनतेलासुध्दा लाभ मिळावा याकरीता बीआरएस पक्षाचे नेते मुख्यमंत्री केसीआर यांनी आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होणाºया जिल्हा परिषद, पंचायत समिती,महानगर पालीका , नगर परिषद यासह लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार केला असुन त्यासंदर्भात तयारीसुध्दा सुरू करण्यात आली असल्याचे श्री. वाकुडकर यांनी यावेळी सांगीतले.

याप्रसंगी बीआरएस पक्षाचे विदर्भसमन्वयक ज्ञानेश्वर वाकुडकर, बीआरएस नेते माजी आमदार चरण वाघमारे, भंडारा जिल्हा समन्वयक मुरलीधर भर्रे, प्रकाश महालगावे, धनंजय मोहरकर, भंडारा विधानसभा समन्वयक अरविंद भालाधरे, साकोली विधानसभा समन्वयक भास्कर हटवार, माजी जि.प. सदस्य व्यंकट मेश्राम आदि उपस्थित होते.

तेलंगणात वर्षभर धान खरेदी तर…..!

चरण वाघमारे तेलंगणा राज्यात वर्षभर शेतकºयाचे धान खरेदी केले जाते त्यामुळे तेथील शेतकºयांवर खाजगी व्यापाºयाांकडे आपले धान विकण्याची वेळच येत नाही.व त्यांना त्यांच्या धानपिकांचा योग्य मोबदला मिळतो.मात्र आपल्याकडे एवढया मोठया प्रमाणात धान पिकांचे उत्पादन होवुनसुध्दा फक्त काही ठराविक कालावधी करीताच धान खरेदी केंद्र सुरू केल्या जाते. शासनातर्फे लादण्यात आलेल्या जाचक अटी-शर्तीमुळे आजघडीला अनेक केंद्र चालकांनी अद्यापही धान खरेदी सुरूच केली नाही.ज्याचा फटका शेतकºयााला बसत आहे.

परिणामी शेतकरी वर्गावर त्यांचेकडील धान खाजगी व्यापाºयाला विकण्याची वेळ आली आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.याला महाराष्ट्रातील राज्य सरकार पुर्णपणे जबाबदार आहे. आपण आमदार असतांना रोजगार हमी योजनेमधुन शेतकºयांच्या शेतातील नांगरणी,वखरणी यासह शक्य ती शेतीची कामे करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.रोहयो तुन शेतीची कामे झाल्यास शेतीला येणाºया एकुण खचार्तुन बºयापैकी खर्च कमी होवुन शेतकºयाला दिलास मिळाला असता.

बीआरएस स्वतंत्रपणे निवडणुका लढणार!

आगामी काळात महाराष्ट्रात होवु घातलेल्या लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असुन कुणासोबतही युती किंवा आघाडी करणार नाही.युती-आघाडीकरीता महाराष्ट्रातील अनेक पक्षांचे प्रस्ताव बीआरएस कडे आले ज्यामध्ये प्रहार, गोंडवाणा पक्ष,वंचित बहुजन आघाडी, जनस्वराज्य पक्ष यासह अनेक पक्षांचा त्यात समावेश आहे मात्र बीआरएस स्वतंत्रपणे निवडणुक लढणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्रात तुमसर विधानसभा क्षेत्रात सर्वाधीक सदस्य नोंदणी

‘अबकी बार-किसान सरकार’ हेच आमच्या पक्षाचे धोरण असुन देशातील ६५ टक्के जनता शेतकरी आहे.त्यामुळेच आम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातुन बीआरएस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू केली आहे.त्याला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत असुन अवघ्या काही दिवसातच लाखों च्या वर सदस्य नोंदणीसुध्दा झाली आहे.विशेष म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रात तुमसर विधानसभा क्षेत्रात सर्वाधीक सदस्य नोदणी झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.