अमोल मस्के यांचे दु:खद निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गणेशपुर येथील आदर्श नगरातील रहिवासी अमोल दादाराम मस्के (४१ वर्षे) यांचे दीर्घ आजारामुळे नागपूर येथील ओरिअस हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान गुरूवार दिनांक १२ जानेवारी ला सकाळी ५ वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भंडारा येथील वैनगंगा नदीच्या काठावरील स्मशानभूमीवर गुरूवारला दुपारी १ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आईवडील, दोन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. शोकसभा सेवानिवृत्त वन कर्मचारी विजय मेहर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्याप्रसंगी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल मस्के हे ज्येष्ठ अर्जनविस दादाराम मस्के यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के व पोलीस विभागात कार्यरत लोकेश मस्के यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *