मुजबी ते अग्रवाल पेट्रोलपंप पर्यंत महामार्गाची डागडुजी करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ हा शहरवासीयांसाठी अवजड वाहनांमुळे परिणामी होणाºया लहान-मोठया अपघातामुळे डोकेदुखी ठरत असल्या कारणाने रिंग रोडचे काम सुरू असले तरी सध्याच्या परिस्थितीत हया महामार्गावरून होणारी वाहतुक ही शहरातूनच होत असल्यामुळे वाहतुकीचे मोठे दुष्परिणाम शहरवासियांवर होत आहेत. रिंग रोडच्या कामामुळे हया महामार्गावर ट्राफिक जाम होत आहे. रिंग रोडच्या कामामुळे या महामार्गावर ट्राफिक जाम ही नित्याचीच बाब बनलेली असून ट्राफिक जाम मुळे रोडच्या बाजूने हलकी वाहने, बसेस काढत असल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठी खड्डे पडल्यामुळे याचा प्रचंड त्रास शहरातील तसेच बाहेरून येणाºया जाणाºया दुचाकीस्वारांना होत असल्यामुळे या खड्डयांची त्वरीत डागडुजी करण्याची मागणी शिवसेने च्या वतीने निवेदनातून केले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी ते शिंगोरी हया दरम्यानच्या महामार्गाची देखभालीची जबाबदारी ही अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची आहे. महामार्गावरील रोज होणाºया ट्राफिक जाममुळे भंडारा शहरवासी वैतागले आहेत.

एखादाच दिवस असा उजाडतो ज्या दिवशी या महामार्गावर ट्राफिक जाम नसतो, नाहीतरी वेगवेगळ्या कारणांमुळे हा ट्राफिक जाम असतोच असतो. मग हया जाम मधुन आपली गाडी पुढे कशी काढता येईल. याकरीता काही वाहनचालक, बसचालक वाहनांच्या लागलेल्या रांगेच्या बाजूने आपली वाहने काढत असल्यामुळे महामार्गाच्या बाजुला मुजबीपासून ते अग्रवाल पे. पंप पर्यंत गेल्या महिनाभरापासून मोठमोठी खड्डे तयार झालेले आहेत. परंतु महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या अशोका कंपनीला याचे जणु काही देणे-घेणेच नाही अशा भुमिकेतून वावरत आहे. परंतु हया महामार्गावरून जा-ये करणाºया शहरातील तसेच बाहेरील वाहनधारकांना या खड्डयांमुळे होणारा त्रास लक्षात घेता अशोका कंपनीने तीन दिवसात हे खड्डे बुजविण्याची काम करावे. अन्यथा शिवसेना अशोका कंपनीच्या टोलचा आपल्या पध्दतीने समाचार घेईल. याची कंपनी प्रशासनाने दखल घेण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वात पदाधिकाºयांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *