भक्ती म्हणजे मानवी जीवनातील एक प्रेरक शक्तीस्थान

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भक्ती ही मानवी जीवनातील एक प्रेरक शक्तीस्थान आहे. प्राचीन कला आणि ज्ञान आधारशिला ही शक्तीच होय. प्राचीन साहित्याचे, शिल्पकार म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि रामदास ही सर्व संतमंडळी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ अतिशय साधी व सरळ पंरतु लोकांना आयुष्यभर मार्गदर्शन करणारा आहे. ज्ञानेश्वरी आणि संत साहित्य त्तत्व आणि बोध साहित्य कृतीचा मुकूटमणी आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी व हरिपाठाच्या माध्यमातूनच हे अलौकिक शब्दरूप दर्शन समाजाने अंगीकार करावा, असे हभप धनराज गाढवे महाराज यांनी निलज बु. येथे आयोजित प्रवचनाच्या माध्यमातूनच सांगितले. मोहाडी तालुक्यातील निलज बु. येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात दरवर्षी श्रावण मासानिमित्त हिंदू धर्मग्रंथांचे व संत साहित्याचे पारायण व प्रवचनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या हरिपाठाचे प्रवचन व पारायण प्रवचनकार हभप धनराज गाढवे महाराज यांच्या मुखातून सुरू आहे. मंदीरातील परायणाचे यंदाचे ७ वे वर्ष आहे. त्याआधी हे पारायण घरोघरी व्हायचे. आत्मपरिक्षण आणि आत्मसमर्पण चैतन्याची प्रतिची देते आणि हे आपल्या महाराष्ट्रीय संतभूमीत नसानसात भिनले आहे.

या वारीमुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता आल्यामुळे माणसात एक सात्विक वृत्ती होते. पूर्वी अभंग, पोवडा, संताच्या ओव्या हाच समाज प्रबोधनाचा गाभा होता. एकत्मता कशी ऐकवावी आणि कशी घडवावी याचे उदात्त उदाहरण म्हणजे वारी होय. भेदाभेद ही वाइट भावना या वारीतून निघून जाते. माणूस घेऊन जगणे हे या वारीत शिकायला मिळते. हे विश्वची माझे घर, सकस अशी जीवनाला जगण्यासाठी भाग पाडणारी संकल्पना ज्ञानेश्वरांनी अतिशय लौकीक अर्थाने मांडली आहे. ही संकल्पना आत्मसात करायला कुठल्याही जाती धर्माचा आधार लागत नाही. एवढा सरळसरळ अर्थच संतानी आपल्या मागे खजिन्याच्या स्वरुपात ठेवला आहे. त्याचे आपण जतन करायलाच हवे, असेही प्रवचनातून सांगण्यात आले. प्रवचनाच्या निमित्ताने महिनाभर हभप धनराज गाढवे महाराजांनी संत ज्ञानेश्वर महा राजांच्या हरिपाठातील अभंगाचे व ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. या प्रवाचनाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीच्या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात येते. प्रवचन दररोज सायंकाळी ७ वाजता सुरू होतो व दीड तास चालतो. प्रवचनाच्या अखेरीस आरती व प्रसाद वितरण करून प्रवचनाची सांगता करण्यात येते. या कार्यक्रमाची सांगता श्रावण महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे. या प्रवचनाला शंकर कांबळे, धनवर बडगे, शालिक ईश्वरकर, दामोदर ईश्वरकर, अरविंद देवगडे, चुन्नीलाल माटे, ईश्वर बुधे, वासुदेव बडगे, रामा धोटे, प्रेमलाल कांबळे, रामू कनपटे, महिला, लहान मुले व भाविक न चुकता उपस्थित राहतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *