तामसवाडीची अक्षदा पडोळे यूपीएससी परीक्षेत देशात तिसरी!

आज आश्विन वद्य १२ हा या सणाचा खºया अर्थाने पहिला दिवस. धनतेरस किंवा धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरीची कथा समुद्र मथनाशी निगडीत आहे. याबाबतीत पुराणात आलेली कथा अशी आहे. विद्याधरीने दिलेली दिव्य माळ दुर्वास ऋषीनी इंद्राला दिली. इंद्राने ती ऐरावतीच्या गळ्यात घातली. ऐरावतीने ती तोडून टाकली. दुर्वासाला हा अपमान सहन न होऊन त्याने तुझे ऐश्वर्य नष्ट होवो “असा इंद्राला शाप दिला. सर्व देव विष्णूकडे गेले व दुवार्साच्या शापातून वाचविण्याची विनंती केली. भगवान विष्णूने समुद्र मंथनाचा सल्ला दिला. तेव्हा देव-दानवानी मंदराचल पर्वताची रवी व वासुकी नागाची दोरी करून समुद्र मंथन केले. त्यातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनू, ऐरावत, रंभा, उचे:श्रवा, शारंग, धनुष्य व अमृत ही चौदा रत्ने प्रकट झाली. समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन आश्विन वद्य त्रयोदशीला प्रकट झाले. त्याची स्मृती म्हणून हा दिवस साजरा करतात. धन्वंतरी ही आरोग्याची देवता असल्यामुळे या दिवशी प्रात:काळी आपले मंगल स्नान उरकतात व अंगाला उटणे किंवा हळद-पीठाचे मिश्रण लावून ते स्नान करतात. त्यानंतर भगवान धन्वंतरीची पूजा करून निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.

मोहाडी येथूनदहा किलोमीटर अंतरावर असलेला तामसवाडी येथील रहिवासी अक्षदा राजेश पडोळे ही यूपीएससीच्या परीक्षेत देशात मुलीमधून तिसरी आली आहे. देव्हाडी येथील श्रीराम विद्यालयातील सेवानिवृत्त लिपिक नामदेव तुळशीराम पडोळे व तुमसर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले विनोबा नगरातील रहिवाशी दिलवर फुलचंद चौधरी व जिल्हा परिषद शाळा मोहगाव खदान येथील मुख्याध्यापिका पुष्पा दिलवर चौधरी यांची नातीन होय. अक्षदाने केजीवन ते केजी टू पर्यंत शांती कान्व्हेंट तुमसर, इयत्ता पहिली ते दुसरी मातोश्री विद्यामंदिर तुमसर येथे प्राचार्य किशोर पेठकर, वर्गशिक्षक मेश्राम, इयत्ता तिसरी ते दहावी फादर एंगल स्कूल तुमसर येथे प्राचार्य फादर अंथोनी कारडोसे, शिक्षक सतीश नानगावे, इयत्ता अकरावी ते बारावी यूएसए विद्यानिकेतन तुमसर येथे प्राचार्य एस.के.दुबे, प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजिनिअर नागपूर येथे प्राचार्य डाले, वर्गशिक्षक मनीषा सावलानी यांनी दोन महिने शिक्षण घेतले. संघ लोकसेवा आयोग द्वाराराष्ट्रीय रक्षा अकादमीची परीक्षा १६ एप्रिल २०२३ ला झाल्यानंतर त्यात पास होऊन सर्विस सिलेक्शन बोर्ड द्वारा पाच दिवसाची मुलाखत घेण्यात येते. यामध्ये सात ते आठ लाख मुला-मुलींनी परीक्षा दिली.

त्यात आठ हजार मुल-मुले उत्तीर्ण होऊन एसएसबी इंटरव्यू द्यायला जातात. यात पाचशे ते सहाशे मुल-मुलीची निवड होते. त्यानंतर त्यांची चिकित्सा परिक्षण होते. झालेल्या परीक्षेत ६२८ मुलामुलींची निवड करण्यात आली. त्यामध्ये तामसवाडीची अक्षदा राजेश पडोळे हिने आॅल इंडिया रँकमध्ये २० वी आली असूनमुलीमध्ये दुसरा रँक आला. एनडीए एक्झाम फक्त मुलाकरिता होते. पण सर्वोच्च न्यायालयाने २४ सप्टेंबर २०२१ ला मुलीं करिता एनडीए परीक्षा बसण्याची परवानगी दिली. अक्षदाची पहिली परीक्षा १४ नोव्हेंबर२०२१ ला झाली. त्यात ती नापास झाली. पण प्रयत्न सोडले नाही. त्यानंतर आॅनलाईन क्लासेस केले. व दुसरा प्रयत्न १० एप्रिल २०२२ ला दिला. त्यात उत्तीर्ण झाली. पण इंटरव्यूसाठी कमांडोर सचिन जोग पुणे यांच्याकडे १५ दिवसाच्या क्लास करून २५ ते २९ आॅगस्ट २०२२ पर्यंत भोपाल येथे एसएसबी इंटरव्यू दिला. त्यात सुद्धा उत्तीर्ण झाली व मेडिकल मुळे अनफिट केले. मेडिकल बोर्डमध्ये अर्ज टाकला. त्यास सुद्धा अनफिट झाल्यानंतर फींस्रस्रीं’ मेडिकल बोर्ड करता दिल्ली येथे गेली. त्यातून फिट झाली. या सगळ्या मेडिकल परीक्षेच्या मधात पेपरच्या तिसरा प्रयत्न दिला. जो ४ सप्टेंबर २०२२ ला आला होता.

यात सुद्धा पास झाली. पण मुलींसाठी फक्त १९ जागा असल्यामुळे दुसºया प्रयत्नात सुद्धा एनडीएला जाऊ शकली नाही. पण तिने हार मानली नाही. तिसºया प्रयत्नात एसएसबी इंटरव्यू द्यायला ईलाहबाद गेली. तिथे इंटरव्यू २ ते ६-फेब्रुवारी २०२३ ला झाला. यास सुद्धा निवड झाली. परत मेडिकल एक्झाम झाली. यावेळेस सुद्धा दुसºया कारणामुळे अनफिट केले. परत ंस्रस्रीं’ मेडिकल बोर्डसाठी पुण्याला गेली. आणि तिथून फिट होऊन परत परीक्षेच्या तयारीला बसली. मगपरत १६ एप्रिल २०२३ ला परीक्षा दिली. १७ एप्रिल २०२३ ला तिसरा प्रयत्नाचा निकाल आला. पण त्यावेळेस सुद्धा त्या १९ मुलींमध्ये आली नाही व मेरिट आऊट दुसºयाला झाली. पण प्रयत्न सोडला नाही.परत एसएसबी इंटरव्यू द्यायला इलाहाबाद गेली. इंटरव्यू ७ ते११ जुलै २०२३ ला झाला. यात सुद्धा निवड झाली. परत मेडिकलमध्ये अनफिट झाल्यावर पुण्यात ंस्रस्रीं’ मेडिकल बोर्ड मध्ये जाऊन फिट झाली. हा सुद्धा आखरी प्रयत्न असल्यामुळे परत एक वर्ष शिक्षणात गॅप देणे चुकीचे समजले. म्हणून यावर्षी प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजीनियर नागपूरमध्ये प्रवेश घेतला. दोन महिने कॉलेज गेली व गुरुवार दि.२६ आॅक्टोबर २०२३ ला आखरी प्रयत्नाची मेरिट लिस्ट आली.

यात आॅल इंडिया रँक २० आला व मुलींमध्ये तिसरा रॅक आला. आता तिची जॉइनिंग २२ डिसेंबर २०२३ ला होईल. तिची ट्रेनिंग तीन वर्ष राष्ट्रीय अकादमी खडकवासला पुणे येथे होईल. त्यानंतर एक वर्षाचे अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून उत्तराखंड येथे होईल. या चार वर्षे ट्रेनिंगनंतर इंडियन आर्मी मध्ये लेμटनंट या पदावर आॅफिसर बनणार. अक्षदाचे वडील राजेश नामदेव पडोळे फ्रेंड्सगृप सहकारी पतसंस्था देवाळी येते ४ वर्षापासून अभिकर्ता म्हणून आजही कार्यरत आहेत. आई लक्ष्मी दिलवर चौधरी शारदा नर्सिंग शाळा खापा येथे ७ वषार्पासून शिक्षिका म्हणून आजही कार्यरत आहेत. मोठी बहीण आयुश्री राजेश पडोळे तुलसीराम गायकवाड कॉलेज आॅफ इंजीनियर येथून मागच्या वर्षीपदवीधर झाली असून आता ती सध्या एक वर्षापासून पुणे येथे गुरुकुल सोल्युशन या कंपनीत कार्यरत आहे. अक्षदाला नृत्य, बागकाम, नवीन गोष्टी शिंकणे, फुटबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, चित्रपट सुद्धा पाहणे आवडते. आर्मी आॅफिसरबद्दल अनुभव वाटण्याचा छंद आहे. द ब्रेव, इंडियास मोस्ट फियरलेस पार्ट वन, टू , थ्री, बुट्स, बेल्टस, बेरेटस पुस्तकाचे वाचन केले आहे. तिच्या दुसºया प्रयत्नात वरिष्ठ शिवमदादा शेटे सातारा जे सुद्धा आर्मी आॅफिसरची तयारी करत होते त्यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन केले. मेडिकलमध्ये सुद्धा खूप मदत केली. तसेच एनडीए मधून पास झालेला कॅडेट चषक अक्करसिंग पटले यांनी सुद्धा मार्गदर्शन दिले. जेव्हा तिसरा प्रयत्न सुद्धा मेरिट आउट झाली त्यावेळेस मला खूप दु:ख झाला. पण मी एक आर्मी आॅफिसर या परिस्थितीला कसे सांभाळणार हे विचार करून स्वत:ला सांभाळला व परत आखरी प्रयत्नासाठी तयारी सुरू केली. तेव्हा मी मेरिटमध्ये २० वा नंबर आॅल इंडियामध्ये आला.

त्या क्षणाला झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नसल्याचे दैनिक भंडारा पत्रिका दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सदर मुलाखतीचा योग जनकल्याण पतसंस्था तुमसर येथील नित्यनिधी अभिकर्ता श्रीमती वनिता सुनील वहिले यांच्या माध्यमातून घडून आला. आपल्या यशाचे श्रेय आजी मुख्याध्यापिका पुष्पा दीलबर चौधरी, मावशी द किरण अकॅडमीच्या जयश्री किरण डीग्रसे पुणे, मामा केमिकल इंजिनियर चित्तरंजन दिलबर चौधरी दहेज, मामी सॉμटवेअर इंजिनियर चेतना चित्तरंजन चौधरी गुजरात यांना दिले आहे. श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ ढगारे प्राथमिक शाळा शिव शिवाजीनगर तुमसर व्दारा आयोजित माता राणे राजगृह दांडिया नाईट्स-२०१५, एकलव्य ज्ञानवर्धिनी मल्टीप्रबोज आॅर्गनायझेशन नागपूर, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत फुटबॉल, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी, रोलर स्केटिंग, सामान्य ज्ञान स्पर्धा, अखिल भारतीय विद्यार्थी मेळावा- अशा विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला असल्याचे ३५ प्रमाणपत्र उपलब्ध आहेत. यूपीएससी परीक्षेत देशात मुली म्हणून तिसरी आल्याबद्दल अक्षदा राजेश पडोळे हिच्या निवासस्थानी जाऊन तिरुपती मित्र परिवाराचे आदर्श अशोक बडवाईक, शुभम घनश्याम गायधने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. हे विशेष.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *