गावपुढाºयांचे भाग्य मतपेटीत बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील ६४ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक, तर ५ ग्राम पंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी रविवार, ५ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संध्याकाळी पाचपर्यंत मतदान ७९.६१ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६४ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. सार्वत्रिक निवडणुकीसोबतच पोटनिवडणुकही जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील ४ तालुक्यातील एकुण ६४ ग्राम पंचायतीकरीता आज मतदान पार पडले त्यामध्ये तुमसर तालुक्यातील १ ग्राम पंचायतीकरीता ७४.६१ टक्के ,मोहाडी तालुक्यातील ५७ ग्राम पंचायती करीता ८५.०१ टक्के,भंडारा तालुक्यातील २ ग्राम पंचायतीकरीता ८१.२० टक्के तर पवनी तालुक्यातील ४ ग्राम पंचायतीकरीता ८४ टक्के मतदान झाले.

आगामी निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांनी ग्राम पंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे चित्र निवडणुकी दरम्यान दिसून आले. नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर ते परत घेण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागली. जिल्ह्यातील ६४ ग्रामपंंचायतीत आपली सत्ता आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली होती. ग्राम पंचायत निवडणुकीत आमदार,खासदारांप्रमाणे थेट ग्राम पंचायत सरपंच निवडला जाणार असल्याने यावेळी ग्राम पंचायत निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी विविध प्रकारे प्रचार केला. शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या. मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.