बडीत जमिनीचा मोबदला कधी दणार?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसेखुर्द इंदिरा सागर या राष्ट्रीय प्रकल्पात मौजा खैरी / संगम या गावाची शेतजमीन बुडीत क्षेत्रात बाधित झाल्याने शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र ३१ शेतकºयांना अद्यापही बुडीत जमिनीचा कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे कार्यकारी अभियंता गोसे खुर्द प्रकल्प नागपूर विभाग पथक यांना दि.१३ डिसेंबर रोजी निवेदन देऊन मोबदला कधी देणार असा सवाल प्रशासनाला केला आहे. इंदिरा सागर या राष्ट्रीय प्रकल्पात भंडारा तालुक्यातील नदी काठावरील खैरी तसेच संगम बेट ही गावे पूर्णत: बाधित झाल्यामुळे काही लोकांना घरे व जमिनीचा मोबादला देण्यात आला. मात्र नदीकाठा लगत असलेले खैरी तसेच नदीच्या पलीकडील संगम बेट येथील ३१ शेतकरी अद्यापही जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित आहेत. या जमिनीच्या चारही बाजूने नदीचे पाणी असल्यामुळे शेतजमीन तसेच शेतीकडे जाणारे २ ते ३ किमी पर्यंतचे रस्ते पाण्याखाली आहेत. सन २००९ ला गोसे प्रकल्पाची पाण्याची पातळी वाढल्याने शिल्लक असलेल्या शेतजमीनिवर जाण्याचा मार्ग बंद झाला. काही शेतकºयांच्या जमिनी नदीच्या पलीकडे असून चारही बाजूने शेतीभोवती पाणी आहे. त्यामुळे शेतीतून कोणतेही उत्पन्न घेता येत नाही.

शेतीला जाणारा ३ ते ४ किमी पांदन रस्ता पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतावर जाता येत नाही. शेतीच्या रस्त्याबाबत गोसे प्रकल्पाचे अधिकारी समवेत दिनांक ५/२/२०२० ला ग्रामसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला. सर्व शेतकºयांच्या जमिनी वैनगंगा नदी काठावर असून गोसे प्रकल्पाचे बॅक वाटरचे पाणी सतत जमिनी भोवती जमा होत असते. काही जमिनी नदीच्या पलीकडील असून शेतजमिनीवर जाण्यासाठी नदीवर पूल बांधल्याशिवाय पर्याय नाही. सन २००१ पासून ३१ शेतकºयांची शेतजमीन पडीत असून यावर अवलंबून असलेल्या सदस्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कुटुंबातील सदस्य शेतजमिनीवर अवलंबून आहेत. त्यामुळे बुडीत जमीन संपादित करून वाढीव मोबदला मिळण्यासाठी २००१ पासून सतत पाठपुरावा करूनही शेतकºयांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे बुडीत जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी ३१ शेतकºयांनी गोसे प्रकल्प नागपूर विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली आहे. यावेळी सहादेव अतकरी, सुदाम अतकरी, दादराम बारई, हिरालाल पुडके, धनंजय अतकरी, विलास खोब्रागडे आदी शेतकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *