भंडारा येथे जागतिक सायकल दिन साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील बायसिकल असोसिएशन भंडारा व इंडियन मेडिकल असोसिएशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात जवळपास १२० सायकल पटूनी सहभाग घेऊन दि. ३ जुन ला जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात आला. या जागतीक सायकल दिनी रॅलीमध्ये भंडाºयातील बरेचसे डॉक्टर, उद्योजक, विद्यार्थी, खात रोड वरील सायकल ग्रुपचे अतिशय उत्साही सदस्य आणि अनेक महिलांनी सहभाग घेतला. दहा वर्षाच्या मुलापासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत चे सायकलिस्ट शिस्तीमध्ये सायकल चालवीत होते. भंडारा शहर हे ‘सायकल शहर’ म्हणून ओळख निर्माण व्हावी व प्रत्येकाने कमीत कमी स्वत:सोबत दोन सायकलिस्ट जोडावे व सायकलिस्ट लोकांची मोठी साखळी निर्माण करावे असे मार्गदर्शन डॉ. योगेश जिभकाटे यांनी केले.

यावेळी सौ. डॉ.जोगेवार यांनी सायकलिंग चालविण्यामुळे होणारे बरेचसे फायदे सांगितले, त्यात महत्त्वाचा म्हणजे अनेक असंसर्गजन्य रोग जसे डायबेटिस, हायपरटेन्शन, लिव्हर चे आजार टाळता येतात. त्याकरिता जनतेने एकत्र आरोग्य संपदाचे आवाहन केले की सर्वांनी नियमित सायकलिंग करावी. डॉ विशाखा जिभकाटे व आय एम ए सेक्रेटरी डॉ सुचिता घडसिंग म्हणाल्या की, मुलींना होणारे इन्फर्टिलिटीचे आजार हार्मोनल बदलामुळे होणारे आजार सुद्धा सायकलिंग मुळे टाळता येतात. या जागतीक सायकल दिनी बायसिकल क्लब भंडाºयाचे प्रेसिडेंट पंकज हरडे, सचिव ओंकार नखाते, डॉ ओम गिरीपुंजे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ मनीष बत्रा व उद्योजक अमोल मानापुरे यांनी सर्वांना रोज सायकलींग करण्यासाठी पुढे यावे व प्रत्येक महिन्यात भंडारा वासियांसाठी एकदा तरी एकत्र येऊन सायकलिंग करावी असे आव्हान केले. डॉ. मेघरे दाम्पत्य जे भंडाºयात रोज नियमित सायकलिंग करिता प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुद्धा सायकलिंग करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉ राजदीप चौधरी व डॉ अजय शर्मा हे सुद्धा रोज सायकलींग चालवून भंडारा शहरातील लोकांना प्रेरित करत असल्याचे सांगण्यात आले. ह्या वर्षाचे वर्ल्ड सायकल डे चे स्लोगन लोकांचे लक्ष वेधत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.