कोहळी समाज विकास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाळबुद्धे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर गडचिरोली, बालाघाट व अन्य परिसरात वास्तव्यास असलेल्या कोहळी समाजाचे मध्यवर्ती संघटन कोहळी समाज विकास मंडळ नागपूर च्या निवडणुकीत प्रकाश बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या के.पी. प्रतिष्ठा पॅनलने परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना धूळ चारीत एकतर्फी विजय मिळविला. स्वत: प्रकाश बाळबुद्धे हे अध्यक्ष म्हणून विजयी झाले. उच्च शिक्षीत, प्रशासनाचा दांडगा अनुभव, प्रचंड संपर्क, एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी जाणून घेणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या निवडीचा फायदा समाजाला होईल, अशी आशा आहे. सार्वत्रिक निवडणूकी प्रमाणे ही निवडणूक चुरशीची झाली होती. एखाद्या समज मंडळाची निवडणूक अशा पद्धतीने खेळली जाऊ शकते, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. कोहळी समाज विकास मंडळ अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत प्रकाश बाळबुद्धे यांनी दिवाकर निकुरे यांच्यावर एकतर्फी विजय प्राप्त केला. उपाध्यक्ष पदी अमोल पाटील मुंगमोडे, सचिव माणिक लोथे, सहसचिव डॉ. राजेश कापगते, कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश गहाणे, रमेश ग. बोरकर, ओमप्रकाश संग्रामे, डॉ. छाया कापगते, डॉ. नयना बोरकर हे निवडूण आले आहेत.

हितेश ठिकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी सर्व उमेदवार हे प्रतिष्ठा पॅनलचे आहेत. समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या प्रतिष्ठा पॅनलच्या पाठिशी रहात कोहळी समाज बांधवांनी विश्वास दाखविल्याने हा विजय साकार झाला असे म्हणता येईल. हा विजय स्व. शामरावबापू कापगते, स्व. बालाजी पा. बोरकर, स्व. यशवंतराव कापगते यांना समर्पित करतो. विकास मंडळाच्या माध्यमातून नागपूर येथील समाजभवन पूर्ण करणे, समाज संघटन वाढविणे आणि वचननाम्यातील सर्व बाबी पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. निवडणूक संपली असून आता कुणीही कुणाचे प्रतिस्पर्धी नाहीत.

सर्वांच्या सहकार्याने समाजाला पूढे नेऊ अशी प्रतिक्रिया नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी दिली. मंडळाचे १० वर्ष कोषाध्यक्ष राहिलेले रामकृष्ण पुस्तोडे यांचे निधन निवडणूक काळात झाले. त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या विजयाचे श्रेय डॉ.हेमकृष्ण कापगते, पद्मश्री परशूरामजी खुणे, पुष्पा कापगते, कवी हिरामण लांजे, अंजनाबाई खुणे, डॉ. नरहरी खुणे यांच्यासह सर्व मतदार समाज बांधवांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *